DGCA चा मोठा निर्णय ! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर 21 मे पर्यंत निर्बंध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे खबरदारी म्हणून देशातून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील ३१ मे पर्यंत निर्बंध वाढवण्याची घोषणा नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA ) घेतला आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.

हे वाढवण्यात आलेले निर्बंध आंतरराष्ट्रीय ऑल-कार्गो ऑपरेशन आणि उड्डाणांवर लागू नसून, तर आवश्यकता भासल्यावर काही आंतरराष्ट्रीय मार्गांवर संबंधित परवानगीवरून विमान फेऱ्या चालवल्या जाणारआहेतDGCA ने भारतीय वेळेनुसार ३१ मे, रात्री ११.५९ वाजेपर्यंत निर्धारित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान वाहतूक सेवा निलंबित राहणार आहे.

कोरोना कालावधीत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांना सक्षम अधिकाऱ्याकडून निश्चित मार्गांवर ठरावीक कारणांच्या आधारावर चालवण्याची परवानगी देण्यात येऊ शकणार आहे तसेच, गेल्या वर्षी पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर निर्बंध घातले होते. त्यानंतर याबाबत DGCA कडून वेळोवेळी नियमावली आणि मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.