Coronavirus Impact : ‘कोरोना’मुळे जगातील ‘या’ 5 मोठ्या ‘टॉप’च्या कंपन्यांचे बुडाले 46 लाख कोटी रुपये !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या प्रकोपाने जगभरात अब्जोपती आणि त्यांच्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. FAMGA नावाने ओळखल्या जाणार्‍या जगातील 5 सर्वात मोठ्या कंपन्यांना कोरोना व्हायरसमुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये फेसबुक, अ‍ॅप्पल, मायक्रोसॉफ्ट, गुगल आणि अमेझॉन यांचा समावेश आहे. YCharts च्या एका रिपोर्टनुसार, 30 जानेवारी 2020 पासून 13 मार्च 2020 च्या दरम्यान या कंपन्यांचे मार्केट कॅप 623.23 अब्ज डॉलर (सुमारे 46.09 लाख करोड रुपये) ने कमी झाले आहे.

अ‍ॅप्पलचे सर्वात जास्त नुकसान
3 मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित केले होते. या पाच कंपन्यांचे एकुण बाजार भागभांडवल 5.26 ट्रिलियन डॉलरवरून घसरून 4.63 ट्रिलियन डॉलर झाले आहे. 30 जानेवारीला जगातील सर्वात मोठी टेक्नॉलॉजी कंपनी अ‍ॅप्पल इंकचे मार्केट कॅप 1.417 ट्रिलियन डॉलर होते, जे आता 201 अरब डॉलर घटून 1.216 ट्रिलियन डॉलर झाले आहे. मागच्या शुक्रवारपर्यंत या कंपनीचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे.

फेसबुकचे बुडाले 118.88 अरब डॉलर
अ‍ॅप्पलनंतर सर्वात जास्त गुगलची पॅरेन्ट कंपनी अल्फाबेटच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1.001 ट्रिलियन डॉलरवरून 161.7 अब्ज डॉलर घटून 838.30 अब्ज डॉलर झाले आहे. फेसबुकचे मार्केट कॅप 595.25 अब्ज डॉलरवरून घसरून 485.37 अब्ज डॉलर झाले आहे. फेसबुकचे या संकटामुळे 111.88 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉनची स्थिती
मायक्रोसॉफ्ट आणि अ‍ॅप्पलचे मार्केट कॅप अनुक्रमे 106 अब्ज डॉलर आणि 42.65 अब्ज डॉलरने घटले आहे. शुक्रवारी मार्केट बंद होईपर्यंत मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप 1.208 ट्रिलियन डॉलर आणि अमेझॉनचे मार्केट कॅप 888.9 अब्ज डॉलर झाले आहे. कोविड-19 मुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

2020 मध्ये घटणार फेसबुकची कमाई
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील उद्योगांवर मोठा परिणाम होत आहे. या कंपन्यांसह त्यांचे कर्मचारी आणि ग्राहकांवर याचा परिणाम दिसून येत आहे. अ‍ॅप्पलने घोषणा केली आहे की, ते 27 मार्चपर्यंत ग्रेटर चीनमधील आपले सर्व स्टोअर्स बंद ठेवतील. आजून एका प्रसिद्ध एजन्सीने फेसबुकचे 2020 चे रेव्हेन्यूचे टार्गेट 85.14 अब्ज डॉलरने कमी करून 83.39 अब्ज डॉलर केले आहे.

ग्लोबल ग्रोथचा अंदाज घटला
याच महिन्यात ऑर्गेनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटने आपल्या इकॉनॉमिक आऊटलुक रिपोर्टमध्ये 2020साठी इकॉनॉमिक ग्रोथ प्रोजेक्शनला 2.9 टक्क्याने घटवून 2.4 टक्के केले आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात 5,960 लोकांचा मृत्यू झाला आहेत. तर, 1,59,757 लोकांना याचा संसर्ग झाला आहे.