शास्त्रज्ञांचा इशारा ! भारतात 21 ते 28 जून दरम्यान ‘हाहाकार’ माजवणार ‘कोरोना’, टाळायचे असेल तर ‘या’ 20 गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना रूग्णांची संख्या 1,31,000 च्या वर पोहोचली आहे आणि ही आकडेवारी वेगाने वाढत आहे. चीनमधून उद्भवणार्‍या या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत देशात 3,726 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्याने हा आकडा वाढत आहे असे समोर येत आहे. दरम्यान, संशोधकांच्या पथकाने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की 21 ते 28 जून दरम्यान दररोज कोरोना विषाणूच्या संसर्गाची सर्वाधिक संख्या 7,000-7,500 इतकी असू शकते.

कोरोना विषाणू वेगाने वाढत आहे आणि आतापर्यंत जगभरात 53,03,992 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनमधून बाहेर पडलेला हा साथीचा आजार 215 देशांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत 3,40,003 लोक या विषाणूमुळे मरण पावले आहेत.

जूनमध्ये वाढतील कोरोनाची प्रकरणे

या अभ्यासात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की जूनच्या अखेरपर्यंत कोविड -19 ची प्रकरणे वाढतच राहतील. या संशोधनात सामील झालेल्या यादवपूर विद्यापीठाचे ज्येष्ठ प्राध्यापक नंदादुलाल बैरागी म्हणाले, ‘जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापासून संक्रमणाची प्रकरणे दररोज कमी होऊ लागतील.’ संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांमुळे, तपासणी वाढल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत ही प्रकरणे कमी होण्याची शक्यता आहे. यादवपूर विद्यापीठातील गणितीय जीवशास्त्र आणि पर्यावरणीय विज्ञान (बीएमबीई) केंद्राचे प्राध्यापक आणि संयोजक बैरागी व अन्य पाच संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

ऑक्टोबरमध्ये कोरोनापासून मिळेल दिलासा

बैरागी म्हणाले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देशात पाच लाख प्रकरणे असतील आणि त्यानंतर त्यांमध्ये घट होण्यात सुरुवात होईल. तसेच ते म्हणाले की लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या संपर्कात येऊन बर्‍याच लोकांना लागण होईल. या कारणास्तव संसर्गाची प्रकरणे वाढतील. ज्येष्ठ संशोधक म्हणाले की औषधे व लस नसल्यामुळे भारताला आर्थिक हालचाली पुन्हा सुरू करण्याच्या उपायांचा विचार करून संसर्ग रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन सुरू ठेवावे लागेल.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:

– सर्वांना मास्क परिधान करण्याची आवश्यकता नाही. ज्यांना खोकला, ताप, सर्दी इत्यादी असेल त्यांनीच मास्क चा वापर करावा.
– कोरोना रूग्णाची काळजी घेणाऱ्यांनी, डॉक्टर, नर्स किंवा इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मास्क चा वापर करावा.
– खोकला, ताप किंवा श्वास घेण्यात अडचण येत असेल तर चाचणी करावी
– आपण जर अलीकडे परदेशात प्रवास केला असेल तर शासकीय हेल्पलाइन क्रमांकावर 011-23978046 वर कॉल करावा.
– खोकला, शिंका आल्याने, आजारी माणसाला हात दिल्यानंतर, स्वयंपाक करताना, कचरा उचलल्यानंतर, काही खाल्ल्यानंतर, बाहेरून आल्यावर आपले हात साबणाने आणि पाण्याने धुवावेत.
– शिंका आणि खोकला आल्यावर तोंड आणि नाक झाकून ठेवावे.
– वापरलेले टिश्यू डस्टबिनमध्ये टाकावे.
– फ्लूसारख्या लक्षणांनी ग्रस्त लोकांकडे जाणे टाळावे.
– मांस आणि अंडी चांगले शिजवून खावे.
– मांस कापताना प्रत्येक वेळी चाकू स्वच्छ धुतल्यानंतर वापरावा.
– कच्चे मांस हातात पकडल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
– आजारी प्राण्यांचे मांस खाणे टाळा.
– कोणत्याही प्रकारच्या प्राणीजन्य पदार्थांना, वस्तूंना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
– परिसरातील कोणत्याही पाळीव प्राण्यापासून किंवा भटक्या प्राण्यांपासून दूर राहावे.
– ताप आणि खोकल्याने ग्रस्त कोणाकडेही जाणे टाळावे.
– जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे.
– प्राणी व शेतात काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे.
– कच्चे किंवा न शिजवलेल्या प्राण्यांचे मांस खाणे टाळावे.
– दिवसातून किमान दोनदा आपले घर पुसावे.
– साफसफाईच्या वेळी हातमोजे घालावे.