Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8,159 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात आज (बुधवार) 08 हजार 159 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 07 हजार 839 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 60 लाख 08 हजार 750 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.33 टक्के झाला आहे. आज 165 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली (Coronavirus in Maharashtra) आहे. आजपर्यंत 1 लाख 30 हजार 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.09 टक्के इतका झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

राज्यात सध्या 94 हजार 745 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 60 लाख 68 हजार 435 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 62 लाख 37 हजार 755 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 05 लाख 51 हजार 521 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 3 हजार 795 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 346 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 287 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात कोरोना बाधित 11 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04.

– 227 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 484702.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2867.

– एकूण मृत्यू – 8709.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 473126.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9697.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 216 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 209 रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू नाही

– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 262829.

– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1118.

– एकूण मृत्यू – 4323.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 257388.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 4042.

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.44 टक्के

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 73 हजार 336 रुग्णांपैकी 10 लाख 45 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 339 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.44 टक्के आहे.

Gold Price Today | चांदीमध्ये 1223 रूपयांची मोठी ‘घसरण’ अन् सोनं देखील झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव

Ahmednagar News | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम ‘गोत्यात’; फॉरेन्सिक रिपोर्टमधून आली ‘ही’ माहिती समोर

Anil Deshmukh | अनिल देशमुख भूमिगत झाल्याची चर्चा रंगत असतानाच ‘तो’ व्हिडिओ व्हायरल