Coronavirus : महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर ‘या’ राज्यात सर्वाधिक ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी कोविड-१९ च्या १७० हॉटस्पॉट जिह्यांची ओळख केली असून २०७ जिल्ह्यांना संभाव्य हॉट-स्पॉट म्हणून ओळखले गेले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोरपणे नियम पाळण्यास सांगितले गेले आहे, जेणेकरून या जीवघेण्या संक्रमणाचा पुढील प्रसार रोखला जाईल.

कोविड-१९ महामारी विरुद्ध आपले प्रयत्न आणखी वाढवत कुटुंब कल्याण आणि आरोग्य मंत्रालयाने सगळ्या राज्यांना सल्ला दिला आहे की, ७१८ जिल्ह्यांना हॉटस्पॉट आणि नॉन-हॉटस्पॉट जिल्हे आणि ग्रीन झोनमध्ये विभागले आहे. पण मंत्रालयाकडून इशारा दिला आहे की, जे जिल्हे नॉन-हॉटस्पॉट आहेत पण तिथे हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे, तिथे ऑथॉरिटीज लॉकडाऊनच्या नियमांमध्ये कोणतीही सवलत देऊ नये.

सर्वात जास्त तामिळनाडू, युपी, दिल्लीमध्ये हॉटस्पॉट
देशात ज्या जिल्ह्यात हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे त्यापैकी सर्वात जास्त तामिळनाडूतील ३७ जिल्हे आहेत, त्यापैकी २२ जागांची ओळख केली आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात १३, राजस्थानमधील १२, दिल्लीत १० आणि आंध्र प्रदेशात ११ जिल्हे चिन्हित केले गेले आहेत.

यानंतर तेलंगणामध्ये ९ जिल्ह्यांची ओळख केली असून पंजाब, कर्नाटक आणि जम्मू काश्मीरचे ८ जिल्हे आहेत. सोबतच केरळ ७, मध्य प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमधील ६ जिल्ह्यांना हॉटस्पॉट घोषित केले आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि आसामचे ५ जिल्हे आहेत. तर बिहार आणि पश्चिम बंगालमधील ४ जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

नोएडामध्ये ४ ठिकाणी संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित जागांना श्रेणीतून हटवले गेले
गौतमबुद्ध नगर जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित चिन्हित केल्या गेलेल्या ३१ जागांपैकी ४ जागांना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर या श्रेणीतून हटवण्यात आले आहे. जिल्हा दंडाधिकारी सुहास एल वाय यांनी सांगितले की, सेक्टर ७८ मध्ये स्थित हाइट पार्क, सेक्टर १०० स्थित लोटस स्पेसिया, सेक्टर ४१ आणि सेक्टर ३० ला सर्वाधिक संक्रमित श्रेणीतून हटवले गेले आहे. पण तिथे लॉकडाउन सुरू राहील.

जिल्हाधिकारी म्हणाले की, उर्वरित २७ जागा या संसर्गामुळे सर्वाधिक प्रभावित श्रेणीत राहतील. यामध्ये सुपरटेक केपटाऊन सेक्टर ७४, अल्फा फर्स्ट ग्रेटर नोएडा, निराला ग्रीनशायर सेक्टर २ ग्रेटर नोएडा आणि पटवारी व्हिलेज, लॉजिक्स ब्लॉसम काउंटी सेक्टर १३७, पारस टिएरा सेक्टर १३७ आणि वाजिदपूर गाव यांचा समावेश आहे.