पुण्यात संपुर्ण Lockdown लागणार ? अजित पवार यांच्या निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील अनेक जिल्ह्याची तुलना करता पुण्यात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. या पार्श्वभूमीवर कालच मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यासारख्या वाढत्या कोरोना रुग्णाच्या शहरात मागील वर्षी प्रमाणे लॉकडाउन करा अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्या आहेत. तसेच आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या बैठकीत पुण्यातील लॉकडाउन बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी आणखी कडक लॉकडाउन लावायचा का नाही ? या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर अजित पवार यांच्या बैठकीत काय निर्णय होणार आहे याकडे पुणेकरांचे लक्ष लागून आहे.

या दरम्यान, पुणे जिल्ह्यात आणि शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता काल मुंबई उच्च न्यायालयाने पुण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पुण्यामध्ये ॲक्टिव्ह कोरोना बाधित केसेस १.४ लाख आहेत. तसेच पुण्यासारख्या शहरात गेल्या वर्षी प्रमाणे लॉकडाउन करण्याची आवश्यकता आहे असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. तसेच आम्हाला आदेश द्यायला लावू नका असे देखील हाय कोर्टाने सांगितलं आहे.