Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,061 नवीन रुग्ण, तर 9,356 जणांना डिस्चार्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात आज (शनिवार) 06 हजार 061 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 09 हजार 356 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 39 हजार 493 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.72 टक्के झाला आहे. आज 187 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.1 टक्के आहे.

राज्यात सध्यात 71 हजार 050 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 4 कोटी 93 लाख 72 हजार 212 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 63 लाख 47 हजार 820 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 04 लाख 31 हजार 539 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 761 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 1 लाख 33 हजार 845 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

दिवसभरात 204 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात 294 रुग्णांना डिस्चार्ज.
पुण्यात करोनाबाधीत 08 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02.
204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 488682.
पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2295.
एकूण मृत्यू – 8808.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 477579.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9217.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

दिवसभरात 161 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
दिवसभरात 183 रुग्णांना डिस्चार्ज.
शहरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात 1 जणाचा मृत्यू
शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 265774.
शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 853.
एकूण मृत्यू – 4357.
आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 260564.
आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5338.

Web Title :- coronavirus | maharashtra state coronavirus update

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Crime | खळबळजनक ! शिक्षक पतीकडून मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा 7 वेळा गर्भपात

Sperm Count | पुरुषांच्या ‘या’ 5 चुकांमुळे सुद्धा कमी होतो स्पर्म काऊंट, करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

Neeraj Chopra | सुवर्णपदक विजेत्या नीरजने घेतले पुण्यात प्रशिक्षण