भिवंडीत ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांवर चाकूने वार

पोलिसनामा ऑनलाईन – दोघांमधील वाद सोडविताना राग आल्यामुळे ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना भिवंडी शहरातील टावरे कंपाउंड इथे घडली आहे. प्रफुल्ल दळवी ( वय 52) असे जखमी झालेल्या पोलिसचो नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

काल देशभरात बकरी ईद सण साजरा होत असतानाच भिवंडीत ही घटना घडली. दोन जणांमधील वाद झालेला वाद सोडवत असतानाच पोलिसावर वार करण्यात आले. पोलिसाने दोघांनाही समजवले असता, तरुणाने अरेरावीची भाषा करत त्यांच्यावरच धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत पोलीस गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ड्युटीवर असलेल्या पोलिसाने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामधील एकाने वर्दीमध्ये असलेल्या पोलिसाच्या हातावर, पाठीवर चाकूने वार करून जखमी करून पळ काढला.