‘कोरोनाच्या नवीन स्ट्रेनविरुद्ध आमची लस पूर्णपणे प्रभावी’, अमेरिकन कंपनी ‘मॉडर्ना’चा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा धोका सतत वाढत आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडल्यानंतर जगभरात दहशत वाढली आहे. या नवीन स्ट्रेनबद्दल जगभरात भीती आहे आणि लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. दरम्यान, लस तयार करणारी अमेरिकन कंपनी मॉडर्नाने म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनविरूद्ध त्याची लस पूर्णपणे प्रभावी आहे.

खरं तर, मॉडर्नासह अनेक औषधी कंपन्यांनी कोरोनाची एक लस तयार केली आहे जी अमेरिकेत देखील दिली जात आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये व्हायरसच्या नवीन स्ट्रेनची भीती वाढली आहे आणि लोकांच्या मनात बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. ते किती धोकादायक आहे. या विरूद्ध लस प्रभावी आहे की नाही?

एका निवेदनात, मॉर्डना कंपनीने म्हटले आहे की, कोणत्याही स्ट्रेनविरुद्ध आपल्या लसीच्या परिणामाची तपासणी करण्यासाठी ते चाचणी घेण्याची योजना आखत आहेत. कंपनीने म्हटले आहे की, अमेरिकेमध्ये आपत्कालीन वापरासाठी नुकतीच मंजूर मिळाली आहे त्याची लसदेखील ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनपासून संरक्षणात्मक होईल अशी आशा आहे.

अमेरिकेतील कंपनीने आपल्या अपेक्षेची पुष्टी करण्यासाठी येत्या आठवड्यात लसीची अतिरिक्त चाचणी घेण्याचे सांगितले. मोडर्ना यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा ब्रिटिश सरकार कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनमुळे कठोर निर्बंध लागू करण्याचा विचार करीत आहे. फायझर प्रमाणेच मॉडर्नाची लसही अगदी कमी तापमानात ठेवावी लागते. ही लस 94 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे, ज्यावेळी जग कोरोना विषाणूविरूद्ध लस तयार करण्यात व्यस्त आहे, त्यावेळेस यूकेमध्ये समोर आलेल्या कोरोनामधील नवीन स्ट्रेनने चिंता वाढली आहे. तथापि, तज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना लस नवीन स्ट्रेनवर कार्य करण्यास सक्षम असेल आणि अशामध्ये घाबरण्याची गरज नाही.