COVID-19 : ‘कोरोना’चं नवं रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय संघाला कोरोना विषाणूबद्दल नवीन माहिती मिळाली आहे. जागतिक अभ्यासातून दिसून आले आहे की, कोरोना विषाणूच्या नवीन रूपात लोकांमध्ये अधिक लवकर संसर्ग होण्याची क्षमता आहे आणि सध्या कोरोनाच्या या रुपामुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होत आहेत. अहवालानुसार, संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूचे नवीन रूप युरोपमधून अमेरिकेत पोहोचले आहे. नवीन म्युटेशनात संक्रमणाची अधिक क्षमता असते. दरम्यान, कोरोनाचे नवीन रूप पूर्वीच्या म्युटेशनपेक्षा सकारात्मक लोकांना अधिक आजारी बनवित नाही.

आता संशोधक लसीद्वारे कोरोना विषाणूचे नवीन रूप नियंत्रित केले जाऊ शकते कि नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत, कोरोना विषाणूच्या जुन्या आवृत्तीच्या आधारे विकसनशील असलेल्या लस तयार केली गेली आहे. संशोधकांनी नवीन म्युटेशनमध्ये G614 असे नाव दिले आहे. हा अभ्यास सेल नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. अभ्यासादरम्यान, दिसून आले की, नवीन संक्रमित लोकांमध्ये व्हायरसच्या नवीन म्युटेशनचे प्रभुत्व आहे. ब्रिटनमधील ड्यूक युनिव्हर्सिटीचे डेव्हिड माँटफेयोर म्हणाले की, आम्हाला तपासणीत आढळले आहे की, G614 जुन्या D614 पेक्षा 3 ते 9 पट जास्त संसर्गजन्य आहे.

लॉस एलमॉस नॅशनल लॅबचे बायोलॉजिस्ट बेटे कॉर्बर म्हणाले की, जागतिक आकडेवारीवरून दिसून आले की, G614 नावाचा कोरोना विषाणू जुन्या D614 च्या तुलनेत अधिक वेगाने पसरत आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, 1 मार्च पूर्वी G614 युरोपच्या बाहेर दिसत नव्हता, परंतु आता तो जगभर पसरला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like