धक्कादायक ! जपानी क्रूझवर आढळले नवे 67 ‘कोरोना’ग्रस्त ‘रुग्ण’, ‘भारतीय’ रुग्णांची ‘प्रकृती’ सुधारतेय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जपानच्या योकोहामा बंदरावर डायमंड प्रिसेंस क्रूझवर 67 नवे कोरोना व्हायरस ग्रस्त प्रवासी आढळले आहेत. तर जपानमधील भारतीय दुतावासाने माहिती दिली की क्रूझवरील तीन पीडित भारतीयांची तब्येत सुधारत आहे आणि क्रूझवरील अन्य कोणतेही भारतीय या व्हायरसने बाधित नाहीत. अमेरिकेने सांगितले की शनिवारी ते जपानला एक विमान पाठवतील आणि अमेरिकी प्रवाशांना परत आणतील.

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यांची संख्या 1,523 झाली आहे. तर रुग्णांची संख्या 66,492 झाली आहे. देशातील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी याची माहिती दिली. 2,641 नवी प्रकरणं शुक्रवारी समोर आली. तर 1,373 रुग्णांना ठीक झाल्यावर रुग्णालयातून सोडण्यात आले.

आफ्रिकी महद्विपांवर पहिले प्रकरण समोर –
इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळ्याचे सांगितले. आफ्रिकी महद्वीपांवर हे पहिलेच प्रकरणं असेल. मंत्रालयाने एक विधान दिले की, राष्ट्रीयत्वाची माहिती न देता हा रुग्ण परदेशी असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता खालिद मेगाहेद म्हणाले की पीडिताला देखरेखीत ठेवण्यात आले आहे आणि डब्ल्यूएचओला याची माहिती देण्यात आली आहे.

फेसबूकने आपली ग्लोबल मार्केटिंग समिट देखील रद्द केली आहे जी 9 – 12 मार्चला आयोजित केली होती. यात 5000 पेक्षा आधिक लोक सहभागी होणार होते. तसेच आरएसए सायबर स्पेस सम्मेलनात आयबीएम सहभागी होणार नाही. हे सम्मेलन 24 ते 28 फेब्रुवारीला होणार होते. यापूर्वी फ्लॅगशिप मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2020 सम्मेलन रद्द केले होते.

थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे जानेवारीपासून 34 प्रकरणं समोर आली आहेत. त्यानंतर आता 35 वर्षीय आणखी एक थाई महिला या व्हायरसमुळे पीडित आहे. जी एक आरोग्य कर्मचारी आहे.

चीनमध्ये शुक्रवारी 143 जणांचा मृत्यू –
शुक्रवारी चीनमध्ये 143 जणांचा मृत्यू झाला आहे. हुबेई प्रांतातील 139 लोकांचा सहभाग आहे. याशिवाय हेनानमध्ये 2, बीजिंग आणि चेंगकिंगमध्ये एक एक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2,277 नवे संशोधित समोर आले आहेत.

849 गंभीर रुग्ण –
शुक्रवारी 849 गंभीर रुग्ण आहेत. तर 1,37 लोकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. चीनमध्ये रुग्णांची संख्या शुक्रवारी 66,492 पर्यंत पोहचली आणि 1,523 लोक या आजाराचे शिकार झाले आहेत. 11,053 रुग्ण गंभीर स्थितीत आहेत आणि 8,969 लोक व्हायरसमुळे बाधित आहेत. शुक्रवारी चीन सरकारने कोरोना व्हायरस कमी झाल्याची माहिती दिली. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सांगितले.