Coronavirus Impact : ‘करोना’ मुळं इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ ‘या’ 3 राज्यात रिलीज होणार नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार इरफान खान, राधिका मदन आणि करीना कपूर स्टारर अंग्रेजी मीडियम हा सिनेमा आज (शुक्रवार दि 13 मार्च 2020) पडद्यावर रिलीज होत आहे. परंतु जगभरात दहशत पसरवणाऱ्या कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहता आता हा सिनेमा देशातल्या तीन राज्यात रिलीज होणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

आज हा सिनेमा सर्वत्र रिलीज झाला आहे. परंतु दिल्ली, केरळ आणि जम्मू काश्मीरमध्ये रिलीज होणार नाही. कारण या तिन्ही राज्यांमध्ये सरकारची गाईडलाईन आल्यानंतर अनेक राज्यांनी आपापल्या ठिकाणचे थिएटर आणि मल्टीप्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, केरळ, दिल्ली आणि जम्मू काश्मीरमध्ये 31 मार्च 2020 पर्यंत सर्व थिएटर आणि मल्टीप्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तिन्ही राज्यात अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 31 मार्चनंतर रिलीज होणार आहे. डायरेक्टर होमी अदजानिया म्हणाला, “अंग्रेजी मीडियम हा सिनेमा इरफान खानचा सिनेमा हिंदी मीडियमचा सीक्वल आहे.

देशात कोरोना व्हायसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात 74 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे तर एकाचा मृत्यू झाला आहे. यानंतर आता सर्वच लोक खबरदारी घेताना दिसत आहेत. अनेक स्टार्स आपले दौरे रद्द करताना दिसत आहेत. नुकतीच सूर्यवंशी सिनेमानंही आपली रिलीज डेट टाळली आहे. हा सिनेमा 24 मार्च 2020 रोजी रिलीज होणार होता.