‘कोरोना’मुळे कर्मचार्‍यांच्या डोक्यावर टांगती तलवार, ‘ही’ कंपनी 2200 जणांना काढणार

कोरोना(coronavirus)मुळे आज सर्वांनाचं आर्थिक संकटाला समोर जावं लागत आहे. कोरोना(coronavirus) महामारीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. परिणामी, जागतिक पातळीवर अनेक व्यवहार ठप्प झाले. अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या. जगातील सर्वात मोठी पेय कंपन्यांपैकी एक असलेल्या कोका-कोलानेही यादरम्यान मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी नोकर्‍या कपात करणार असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या महामारीनंतर २०२१ मध्ये बाजारपेठेतील चांगल्या तयारीसाठी पुनर्रचना योजनेचा एक भाग म्हणून २२०० नोकऱ्यांमध्ये कपात केली जाईल, वास्तविक कोरोनामुळे यावर्षी विक्रीवर परिणाम झाला आहे असं याकोका-कोलाने सांगितलं आहे. या संदर्भात कंपनीच्या प्रवक्ते म्हणाले, की या महामारीमुळे त्याचा परिणाम कंपनीच्या जागतिक वर्कफोर्सच्या २.६ टक्के होईल आणि केवळ अमेरिकेतच १,२०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या घोषणेनुसार कंपनीने हे पाऊल उचलले आहे. कर्मचार्‍यांच्या तुटवड्यामुळे १७ ते ९ युनिटमध्ये काम कमी झाले आहे. ग्लोबल सेव्हरन्स प्रोग्राममधून ३५०० दशलक्ष ते ५५०० दशलक्ष डॉलर्स खर्च होण्याची कंपनीची अपेक्षा आहे. कोका-कोलाने एक वॉलंटरी सेपरेशन कार्यक्रम तयार केला आहे, परंतु काही टप्प्यावर ‘इनवॉलंटरी’ काम करणार्‍यांना कमी करण्याची देखील आवश्यकता असेल. त्यामुळे यात बदल घडवून आणण्याचे काम सुरु आहे असं प्रवक्त्याने सांगितलं.

तिसऱ्या तिमाहीत कोका-कोला ३३ टक्क्यांनी घटून १.७ अब्ज डॉलर्सवर आला आहे. त्याच वेळी कंपनीच्या महसुलात नऊ टक्क्यांनी घट होऊन ती ८.७ अब्ज डॉलरवर गेली आहे.