माकडांच्या संख्येत मोठी घट, ‘कोरोना’ वॅक्सीन तयार करण्यास होणार उशीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत माकडांच्या संख्येत मोठी घट झाली आहे त्यामुळे कोरोना वॅक्सीन तयार करण्यासाठी उशीर होऊ शकतो. अटलांटिक मॅगझीन मध्ये छापून आलेल्या माहितीनुसार अमेरिकन रिसर्चर्सनी चेतावणी दिली आहे आहे की देशभरात माकडांची संख्या कमी झाली आहे.

या अहवालानुसार, कोरोना संक्रमणामुळे रिसर्चसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अमेरिकेच्या नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरच्या मते, बायोमेडिकल रिसर्चसाठी सर्वात अधिक Rhesus या प्रजातीच्या माकडांचा वापर केला जातो.

कॅलिफोर्नियाच्या नॅशनल प्राइमेट रिसर्च सेंटरचे कोइन वॅन रोम्पो यांनी सांगितलं की, राष्ट्रीय पातळीवर माकडांची संख्या खूप कमी झाली आहे. रिसर्च फर्म बायोइक्वलचे सीईओ मार्क लेवीस म्हणाले, आम्हाला सध्या Rhesus प्रजातीचे माकडं मिळत नाहीत ते पूर्णपणे गायब झाले आहेत.

माहितीनुसार, कोरोना संक्रमणामुळे माकडांच्या मागणीत वाढ झाली असून, चीनकडून मिळणाऱ्या माकडांच्या संख्येत घट झाली आहे. मागील वर्षी अमेरिकेत आयात करण्यात आलेल्या 35 हजार माकडांपैकी 60% माकडं चीनमधून आणण्यात आले होते. पण कोरोना संक्रमणामुळे चीनने माकडांची निर्यात बंद केली आहे.

तर दुसरीकडे, कोरोना संक्रमित केलेल्या माकडांना ठेवण्यासाठी विशेष प्रकारच्या बायोसेफ्टी लेवल-3 लॅबची गरज असते, जेणेकरून कोरोना संक्रमण पसरू नये. अमेरिकेत अशा लॅबची संख्या कमी आहे. रिसर्चर्सनी सांगितलं की कोरोना विषाणूच्या टेस्टिंग साठी माकडं खूप उपयोगी पडतात कारण माकडांची इम्युन सिस्टिम जवळजवळ माणसांप्रमाणेच असते.