बाळासाहेब थोरातांनी लिहीलं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले – ‘साधी औषधंही शासकीय रूग्णालयात उपलब्ध नाहीत’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा पुरवठ्याची कमतरता जाणवत आहे. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे शासकीय रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांना द्यावयाची साधी औषधेसुद्धा उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह आलेले ८५ टक्के रुग्ण निव्वळ विलगीकरणात बरे होऊ शकतात. परंतु त्यासाठी आवश्यक औषधं सहज उपलब्ध होणे गरजेचे आहे. हि औषधे नसल्याचे रुग्णाची प्रकृती बिघडते. त्यांना पुढील उपचार देणे गरजेचे ठरते यासाठी औषधं उपलब्ध होण्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.

बाळासाहेब थोरातांनी पत्रात असे म्हंटले आहे की, नगर जिल्ह्याच्या दौऱ्यात स्थानिक पातळीवर जाऊन चर्चा केली. त्यावेळी स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी किमान २४ ते ४८ तासांचा अवधी लागतो. या काळात स्वॅब दिलेल्या रुग्णांचे विलगीकरण केले जात नसल्याचे समोर आले. ते अनेक तालुक्यात रॅपिड अँन्टीजेन टेस्ट किट उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या चाचण्या होत नसल्याने बाधितांच्या संख्येत घट दिसते. पण वस्तूस्थिती तशी नाही. सध्या थोडी जरी कोरोनाची लक्षणे आढळली तर नागरिक HRCT करत आहेत. त्यामुळे स्कॅनींग सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. ही ठिकाणेसुद्धा रुग्ण वाढीचे कारण ठरत आहे. HRCT च्या रिपोर्टचा आग्रह रुग्णालयात दाखल करताना डॉक्टर धरतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय HRCT न करणे आणि आवश्यकता नसताना HRCT करायला न लावणे याबाबत धोरण ठरवणे आवश्यक असल्याचेही थोरात यांनी म्हंटल आहे. रुग्णांना आवश्यकता नसतानाही अनेक डॉक्टर रेमडेसिवीर इंजेक्शनचा आग्रह धरताना दिसतात. याबाबतही राज्यस्तरावर वैद्यकीय व्यावसायिकांना रेमडेसिवीर वापराबाबत स्पष्ट निर्देश देणे आवश्यक आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक १३ हजार ६७४ रुग्ण पुणे येथील असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज किमान ६० हजारांच्या आसपास नविन रुग्णांची नोंद होत आहे. आठवडाभरापूर्वी १८ एप्रिलला आतापर्यंतची सर्वाधिक ६८ हजार ६३१ इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून आले होते. त्यानंतर मात्र हि वाढ स्थिर राहिली आहे. तर होणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून हि दिलासादायक बाब असल्याचे म्हंटल आहे.