Coronavirus : केंद्र सरकारकडून होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जाहीर, म्हणाले – ‘8 तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं’

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था – भारतात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील २४ तासामध्ये ३ लाख ६६ हजार १६१ नवे कोरोना बाधित सापडले आहेत. यामुळे मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली जारी केली आहे. घर बसल्या कोरोनावर उपचार घेणाऱ्या लाखो रुग्णांसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे.

भारतातील कोव्हीड रुग्णांचा आकडा दोन कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ झाली आहे. तर यामधील एक कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ कोरोना रुग्ण जण बरे झाले आहे. तसेच आतापर्यंत २ लाख ४६ हजार ११६ जण मृत्यू पडले आहेत. सध्या भारतात सक्रिय रुग्णाची संख्या ३७ लाख ४५ हजार २३७ एवढी आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. तसेच रुग्ण बरी होण्याची संख्या तीन लाखाहून अधिक आहे. तर आता दैनंदिन रुग्णाच्या संख्येत काहीसा दिलासा आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अनेक राज्यामध्ये कठोर निर्बध लावण्यात आले आहे. तर केंद्र सरकारने होम क्वारंटाईनबाबत कोणती नियमावली जारी केलीय ते बघा.

केंद्र सरकारची होम क्वारंटाईनसाठी नवी नियमावली –
– गृह विलगीकरणातील रुग्णासाठी खोलीही संलग्न- स्वतंत्र स्नानगृहाची सुविधा पाहिजे.

– अन्य आजार आणि वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानेच गृह विलगीकरणाची परवानगी द्यावी.

– रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीचा रुग्णालयाबरोबर नियमित संपर्क असावा.

– विलगीकरणात पूर्णवेळ रुग्णांची काळजी घेणारी व्यक्ती असावी.

– रुग्ण राहत असलेल्या खोलीत भरपूर हवा खेळती राहिली पाहिजे.

– रुग्णांनी घरात असतानाही ३ पदरी वैद्यकीय मास्क वापरला पाहिजे. आठ तासांनंतर हा मास्क बदलणे गरजेचं आहे.

– रुग्ण राहत असलेल्या खोलीतील टेबलचा पृष्ठभाग, दाराच्या कड्या, हँडल यासारख्या गोष्टी फिनाइल याने स्वच्छ करणे आवश्यक आहे.

– गृह विलगीकरणात दहा दिवस राहिल्यानंतर रुग्णाला कोणताही त्रास नसल्यास रुग्णाचे विलगीकरण संपले.

– रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेऊ शकते.