Coronavirus : अमेरिकेत 10 हजार ‘कोरोना’ संशयित, तब्बल 150 जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटनेने च्या वतीने जागतिक महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा संसर्ग चीनमध्ये कमी होत असून जगातील इतर देशात दिवसेंदिवस या विषाणूचा प्रसार वाढत आहे. चीन, इटली, इराक, भारत, पाकिस्तान, अमेरिका या देशात मोठ्या प्रमाणात या विषाणूचा शिरकाव झाला आहे.

चीननंतर इटलीत कोरोना संसर्गित झालेले सर्वाधिक रुग्ण दगावले असून, अमेरिकेतील २ खासदारांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. अमेरिकेत आतापर्यंत १० हजारांपेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे तर १५० जणांचा मृत्यू देखील झालाय. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या प्रभावानंतर पहिल्यांदाच गुरुवारी एकही कोरोनाचा रुग्ण आढळून न आला नाही. मात्र जागतिक पातळीवर कोरोनाची दहशद कायम आहे.

अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे फ्लोरिडाचे खासदार काँग्रेस सदस्य मारिओ डियाज बलार्ट पहिले अमेरिकेचे खासदार आहे ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बलार्ट यांच्या कार्यलयाने सांगितले की, शनिवारी मारिया डियाज यांना ताप व डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांनतर केलेल्या तपासणी मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. त्यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य बेन मैकेएडम यांनाही त्रास जाणवू लागला. तपासणी केल्यांनतर त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी राष्ट्रीय आरोग्य आपत्ती घोषित केली. कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी अमेरिकेन सीनेटने १०० अरब डॉलरचा आपत्कालीन निधीला मान्यता दिली.

तुर्की मध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १९१

पोर्तुगालमध्ये आतापर्यंत ४४८ कोरोनाची लागन झालेले रुग्ण आढळले आहे. अंकारा या दैनिकाच्या वृत्तानुसार तुर्कीत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तर कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या १९१ वर पोहोचली आहे.

दरम्यान, जगभरात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या बुधवारी (१८मार्च) २,१९,०३३ वर पोहचली आहे. कोरोनामुळे १७० हुन अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या ८९५३ वर पोहचली आहे. दुसरीकडे ८२९०९ लोक बरे झाले. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांनी आपला जीव गमावला असून संसर्गित रुग्णांची संख्या १७१ वर पोहचली आहे.