सरकारला प्रश्न विचारल्यानंतर दुसर्‍याच दिवशी ‘सीरम’चे CEO आदर पुनावाला यांनी PM मोदींची केली प्रशंसा, म्हणाले – ‘तुमच्या दृष्टीकोनाचे कौतुक करतो’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना लसी संदर्भात एक दिवस आधी केंद्र सरकारला प्रश्न विचारणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (रविवारी) कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व व समर्थनासाठी त्यांचे आभार मानले आहेत. ऑक्सफोर्ड विद्यापीठासोबत सीरम इन्स्टिट्यूट कोरोना लस तयार करीत आहे.

आदर पूनावाला यांनी ट्विट करत लिहिले की, ‘जागतिक समुदायाला लस देण्याच्या तुमच्या दृष्टीकोनाचे आम्ही कौतुक करतो. भारतासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, तुमच्या नेतृत्वाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. हे स्पष्ट आहे की भारतासाठी आपल्या सर्व व्यवस्था लोकांच्या सर्व गरजा पूर्ण करतील.’

शनिवारी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची लस उत्पादन आणि वितरण क्षमता सर्वांना साथीवर लढायला मदत करेल. पीएम मोदी म्हणाले, ‘साथीच्या काळात भारताने दीडशेहून अधिक देशांना औषधे दिली. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश म्हणून मी तुम्हाला खात्री देतो की भारत पुढे जगासाठी सर्व शक्य ते प्रयत्न करेल. जानेवारी 2021 पासून भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा एक कायमस्वरुपी सदस्य म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांप्रती वचनबद्ध असेल.’

आदर पूनावाला यांनी सरकारला काय विचारले होते?

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ आदर पूनावाला यांनी शनिवारी कोरोना व्हायरस लस खरेदी आणि वितरणासाठी सरकार 80,000 कोटींची तरतूद करणार का असा सवाल केला होता. पूनावाला यांनी ट्वीट केले की, ‘भारत सरकारला पुढील एका वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये उपलब्ध होतील का? भारतात सर्वांसाठी ही लस खरेदी करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी इतक्या रकमेची आवश्यकता असेल.’ त्यांनी यात पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) देखील टॅग केले होते. पूनावाला यांनी म्हटले होते की हेच पुढचे आव्हान आहे ज्याचा आपल्याला सामना करावा लागेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like