WHO चा इशारा, ‘या’ एका गोष्टीच्या कमतरतेमुळे 1.8 बिलियन लोकांवर ‘कोरोना’च्या धोक्याचे सावट

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना व्हायरसपासून वाचण्याच्या उपायांमध्ये पाणी आणि साबणाने हात स्वच्छ करण्याचा समावेश आहे. परंतु, समस्या ही आहे की, हात धुण्यासाठी अनेक ठिकाणी योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. ज्यामुळे व्हायरसला रोखण्यात मोठी समस्या येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जगभरात प्रत्येक चार आरोग्य केंद्रांच्या पाठीमागे एका केंद्रात पाण्याचा अभाव आहे. ज्यामुळे सुमारे 1.8 बिलियन लोकांना कोरोनाचा धोका वाढू शकतो.

मिंट लाइव्हच्या एका रिपोर्टनुसार, डब्ल्यूएचओ आणि युनिसेफद्वारे 165 देशांबाबत झालेल्या एका अभ्यासाच्या रिपोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे की, जगभरात अनेक हेल्थ सेंटर असे आहेत, जिथे रूग्ण आणि स्टाफसाठी पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीची कमतरता आहे.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेबायियस यांनी म्हटले, पाणी आणि स्वच्छतेसारख्या जीवनावश्यक गोष्टींशिवाय काम करणे नर्सेस आणि डॉक्टरांसाठी व्यक्तीगत सुरक्षा उपकरणांशिवाय काम करण्यासारखे आहे. पाणी कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक आहे.

युनिसेफचे प्रमुख हेनरिकेटा यांनी म्हटले, आरोग्य कर्मचारी आणि लोकांना स्वच्छ पाणी, सुरक्षित शौचालये किंवा साबण इत्यादी सुविधांशिवाय उपचारासाठी पाठवणे त्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे.

रिपोर्टमध्ये हे सुद्धा आढळले आहे की, जगभरात तीन आरोग्य केंद्रापैकी एक केंद्र हातांच्या स्वच्छतेची गॅरंटी देऊ शकत नाहीत, तर 10 पैकी एकाकडे स्वच्छता सेवा नाहीत.

जगातील 47 सर्वात कमी विकसित (एलडीसी) देशांसाठी हे आकडे आणखी वाईट आहेत, जेथे आरोग्य सेवांच्या निम्म्या भागात पाण्याची कोणतीही सुविधा नाही, एक चतृर्थांशमध्ये स्वच्छतेसाठी पाण्याची कोणतीही सुविधा नाही, आणि तीनमध्ये जीवनावश्यक स्वच्छता सेवांची कमतरता आहे.