नगरसेवक दिपक मानकर पोलिसांसमोर हजर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर हे लष्कर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्‍तांसमोर हजर झाले आहेत. त्यांच्याविरूध्द समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामिन फेटाळून त्यांना 10 दिवसाच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते.

[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’efd7565a-954c-11e8-ab22-93e0c8358f27′]

शहर पोलिस दलातील गनमॅन शैलेश जगताप यांचे भाऊ आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांनी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहीली होती. त्यामध्ये नगरसेवक दिपक मानकर यांच्यासह इतरांची नावे होती. मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी आणि इतरांविरूध्द लोहमार्ग पोलिसांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केली म्हणून गुन्हा दाखल केला. गुन्हा शहर पोलिसांच्या समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर समर्थ पोलिसांनी काही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान, मानकर यांची जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर मानकर यांची मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तेथील 3 खंडपीठांनी मानकर यांच्या जामिन अर्जावर सुनावणीस नकार दिला. अखेर मानकर यांचा उच्च न्यायालयात देखील जामिन अर्ज फेटाळण्यात आला.

नगरसेवक मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सुनावणी झाली आणि तेथे देखील मानकर यांचा जामिन अर्ज फेटाळला गेला. मानकर यांना त्यानंतर 10 दिवसांच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आज (बुधवारी) दिपक मानकर हे लष्कर विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्‍तांसमोर हजर झाले आहेत. दुपारी त्यांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गुन्हयाचा अधिक तपास पोलिस करीत आहे. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप आणि नगरसेवक दिपक मानकर यांच्यात समर्थ पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या एका जागेवरून वाद झाले होते आणि त्यातूनच जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या केली अशी फिर्याद पोलिसांकडे जितेंद्र जगताप यांच्या मुलाने दिली होती. त्यानंतर संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी काही जणांना अटक केली होती.