नगरसेवक दीपक मानकरांना उच्च न्यायालयाचा झटका

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत भर पडली आहे. मानकरांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयातील तिसर्‍याही खंडपीठाने स्पष्ट नकार दिला आहे. बुधवारी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी मानकरांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. यापुर्वी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती साधना जाधव यांनी मानकरांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. तिसर्‍याही खंडपीठाने जामीन अर्जावरील सुनावणी घेण्यास नकार दिल्याने आता मानकरांना पुन्हा नव्या खंडपीठापुढे याचिका सादर करावी लागणार आहे.

पुणे शहर पोलिस दलात गनमॅन म्हणून ओळखले जाणारे शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी काही दिवसांपुर्वी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये नगरसेवक दीपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी, विनांद भोळे आणि इतरांमुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहीले होते. समर्थ पोलिस ठाण्यासमोरील जमिनीच्या व्यवहारावरून जगताप यांनी आत्महत्या केली होती. जितेंद्र जगताप यांनी आत्महत्या केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी नगरसेवक दीपक मानकर आणि इतरांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सध्या गुन्हयाचा तपास समर्थ पोलिस करीत आहेत. पोलिसांनी काही जणांना जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक देखील केली आहे. दरम्यान, दीपक मानकर यांनी अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून सर्वप्रथम शिवाजीनगर न्यायालयात अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर मानकर यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली.

उच्च न्यायालयातील दोन खंडपीठाने मानकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर मानकर यांनी नव्या खंडपीठाकडे अर्ज केला होता. न्यायमुर्ती प्रकाश नाईक यांनी मानकरांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास आज (बुधवारी) नकार दिला आहे. मानकरांना आता नव्या खंडपीठाकडे अर्ज करावा लागणार आहे. मानकरांच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे.

संबंधित घडामोडी:

नगरसेवक दिपक मानकरांच्या अडचणीत वाढ

राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर, बिल्डर सुधीर कर्नाटकी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांना अटक

आत्महत्येस प्रवृत्‍त केल्याप्रकरणी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकीविरूध्द गुन्हा 

गनमॅन शैलेश जगताप यांच्या भावाची आत्महत्या