नगरसेवक दिपक मानकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्याचे माजी उपमहापौर आण राष्ट्रवादीचे नगरसेवक दिपक मानकर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी दिपक मानकर आणि इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकर यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळला आणि त्यांना 10 दिवसाच्या आत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार मानकर हे आज (बुधवार) लष्कर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांसमोर हजर झाले.
[amazon_link asins=’B019FGR3XQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69d6e664-957a-11e8-96d2-b1cf89563cb3′]
शहर पोलिस दलातील शैलेश जगताप यांचे भाऊ जितेंद्र जगताप यांनी २ जुन रोजी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे गाडी समोर आत्महत्या केली होती. आत्महत्या कर्यापूर्वी जितेंद्र जगताप यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये त्यांनी दिपक मानकर, सुधीर कर्नाटकी आणि आत्महत्येपूर्वी फोटो काढलेल्या फोटोमधील सर्वजण आत्महत्येस कारणीभूत असल्याचे लिहले होते. रास्ता पेठेतील एका जागेच्या वादातून हा प्रकार घडला. पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक दिपक मानकर, बांदकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी, विनोद भोळे यांच्यासह इतर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर दिपक मानकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मानकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही जामीन फेटाळून दहा दिवसांत पोलिसांकडे हजर होण्याचे आदेश दिले होते.