कॉसमॉस बॅक फसवणूक: पुण्यातील दोन ग्राहकांकडून  १ लाख १० हजारांची रिकव्हरी

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

देशातील क्लोन केलेल्या रुपे कार्ड मार्फत तर परदेशातून व्हिसा मार्फत विविध खात्यामधून सुमारे ९४ कोटी ४२ लाख रुपयांवर डल्ला मारुन कॉसमॉस बँकेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने बँकेच्या माहिती विश्लेषणावरुन दोन ग्राहकांकडून १ लाख १० हजार रुपयांची रिकव्हरी केली असल्याचे सुत्रांनी सांगितले.

[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’df185b11-a542-11e8-8d89-71c555c2c547′]

कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरप्रमाणे प्रॉक्सी सर्व्हर उभारुन केलेल्या सायबर दरोडा कोट्यावधी रुपयांची बँकेची फसवणूक करण्यात आली. बँकेने पुणे  पोलिसांच्या विशेष तपासी पथकाला दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका ग्राहकाकडून ९० हजार तर दुसऱ्या ग्राहकाकडून २० हजार रुपयांची रिकव्हरी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही बँकेचे नियमीत ग्राहक आहेत.

बँकेच़्या सर्व्हरवर हल्ला झाला तेव्हा अनेक नियमीत ग्राहकांच़्या खात्यात प्रत्यक्षात असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिसल्याने त़्यांनी मोठ्या रकमा अशा प्रकारे काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यात आणखी रिकव्हरी होऊ शकते असे सुत्रांनी सांगितले.

संबधीत बातमी 

कॉसमॉस बॅक फसवणूक: बँकेप्रमाणेच पोलिसांकडूनही स्वतंत्र सुरक्षा ऑडिट