Covid-19 and Sexual Health : महामारीच्या काळात लैगिंक संबंधाबाबत लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याचे नाव घेत नाही. संसर्ग झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हा विषाणू मनुष्यावर अनेक प्रकारे परिणाम करत आहे. कोरोना विषाणूचा Sexual Health वर ही परिणाम होत आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तज्ञ सामाजिक अंतर, मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि स्वच्छता ठेवण्यावर भर देत आहेत. तर मग हे समजले पाहीजे की या साथीच्या काळात लैंगिक संबंध टाळले पाहिजेत?

जरी या साथीच्या वेळी लैंगिक संबंधाबाबत काही विशिष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या नसतील, परंतू या परिस्थितीत काही नियम पाळणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे मत आहे.

जर्नल लीझर सायन्स च्या एका वृत्तानुसार, साथीच्या काळात लैंगिक संबंधामध्ये झपाट्याने घट झाली आहे. हे आश्चर्यकारक आहे.

सेक्स हा एक चांगला व्यायाम आहे, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. यामुळे व्यक्तीला समाधान मिळते. यामुळे तणाव आणि चिंता कमी होतो, चांगल्या झोपेला उत्तेजन देते आणि मेंदूमध्ये एन्डोफ्रिन आणि ऑक्टिटोसीन सोडते.

अभ्यासानुसार, कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध, अगदी मिठी मारणे आणि किसिंग यामुळे फील गुड हार्मोन निर्माण होते. या तणावपूर्ण काळात लैंगिक संबंध बनवणे एक खुप मोठा मूड-बूस्टर बनू शकते. परंतू महामारीच्या या काळात तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

सहमती आवश्यक

महामारीचा हा काळ प्रत्येकासाठी तणावपूर्वक आहे. प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्या प्रकारच्या तणाव, चिंता आणि अस्वस्थता या परिस्थितीचा सामना करीत आहेत. अशात कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जोडीदाराची संमती घेणे आवश्यक आहे. तुम्ही यासाठी जोडीदाराशी चर्चा करू शकता, कारण त्यांच्या डोक्यामध्ये काय चालू आहे हे कळणे आवश्यक आहे. तज्ञ ही हेच म्हणतात की चांगल्या शारीरिक संबंधासाठी दोन्ही जोडीदाराची सहमती असणे आवश्यक आहे.

टेस्ट करण्यासाठी सांगा

जर तुम्हाला कोरोनाची साधारण लक्षणे असले तरी, तुम्हाला टेस्ट करणे गरजेचे आहे आणि याबद्दल तुम्हाला प्रामाणिकपणे तुमच्या जोडीदाराला सांगावे लागेल. सेक्स दरम्यान विषाणूचा प्रसार होण्याचा धोका आहे. हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की जर तुम्ही आधीपासून एखाद्याशी लैंगिक संबंध ठेवले असेल आणि त्यानंतर लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला टेस्ट करणे गरजेचे आहे.

सतर्क रहा

या संकटात जोखमीबद्दल पारदर्शक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदारासह राहत असाल आणि शारीरिक संबंध ठेवत असल्यास तुम्हाला संसर्ग होण्याची शकता असते. म्ह्णून तुम्ही कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे जसे की गर्दी करणे टाळा, मास्क घाला आणि बाहेर जाताना सामाजिक अंतर ठेवा. तुमच्यापैकी कोणीही या नियमांचे पालन करत नसल्यास धोका वाढू शकतो. संबंध ठेवताना कंडोमचा वापर करा.

तंत्रज्ञानाला जोडीदार बनवा

या महामारीच्या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारापासून वेगळे राहू शकता. वेगळे राहून तुम्ही सेक्स लाईफ एन्जॉय करू शकता. यासाठी तुमच्या फोनचा वापर करा. तुम्ही सेक्सटिंग अथवा व्हिडीओद्वारे हे काम करू शकता. संशोधनानुसार, इंटिमेसी राखण्यासाठी अनेक लोकांसाठी हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये कोणताही धोका नाही, खासकरून जेव्हा तुम्ही पर्सनल फोटो अथवा न्यूड इमेज शेर करता.

तुमच्या जोडीदाराला चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करा

महामारीचा हा काळ सर्वांसाठी कठीण आहे. यावेळी तुम्हाला जोडीदाराची काळजी घेणे हे अधिक महत्वाचे आहे. जर तुम्ही बरेच दूर असाल तर ऑनलाईन डेट आणि ऑनलाईन जेवण एकत्र शेर करू शकता. एकूण गोष्ट अशी आहे की या काळात जास्त एकत्र येण्याचा प्रयत्न करू नका, नेहमी मास्क घाला आणि सामाजिक अंतर ठेवा.