399 रुपयांत घ्या Covid -19 Care@Home; होम क्वारंटाईनमध्ये एक्सपर्ट घेतील तुमची काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या सक्रिय रूग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा अधिक आहे. काही राज्यात नाईट कर्फ्यू तर काही राज्यात सरकारने Lockdown केले आहे. परिस्थिती अशी आहे की मध्य प्रदेशमध्ये केवळ पाच दिवस ऑफिस उघडले जात आहेत, तर दिल्ली सारख्या शहरात फक्त 50 % वर्कफोर्ससह काम करण्याचा विचार चालू आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा सामान्य लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. विशेषतः ते लोक जे एकटे राहतात आणि दुसऱ्या शहरामध्ये कुटुंबापासून दूर नोकरी करण्यासाठी आले आहेत. ते ही अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना कोरोनाची थोडी लक्षणे दिसताच त्यांना होम क्वारंटाईन केले आहे.

सरकारने असे सांगितले आहे की होम क्वारंटाईनच्या कालावधीत जर ऑक्सीजन लेवल कमी झाली तर, अशक्तपणा वाटत असेल तर, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, छातीत दुखत असेल, चेहरा आणि ओठांवर निळेपणा, बोलण्यात अडखळपणा अशी लक्षणे दिसत असतील तर लगेच डॉक्टरांकडून उपाय करून घ्या. परंतू समस्या त्या वेळी वाढते, ज्यावेळी काळजी घेणारे सोबत नसतील अथवा स्वतः जास्त काळजी घेत नसाल तर. हेच कारण आहे की मॅक्स हेल्थ केअरने Covid -19 Care@Home नावाने एक सर्व्हिस सुरु केली आहे. येथे फक्त 399 रुपये देऊन तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्या देखरेखेखाली होम क्वारंटाईन पूर्ण करू शकता.

हे पॅकेजमध्ये आढळेल

मॅक्स हेल्थ केअर एक पॅकेज देत आहे, ज्यात घरी सात सुविधा पुरवल्या जातील. यात, दर तिसऱ्या दिवशी डॉक्टरांकडून फोनवरून रिव्ह्यूव केला जाईल, ज्यात ते तुमची स्थिती कशी आहे याची चौकशी करतील. एक्सटेन्सिव्ह केस असेजमेंट परिचारिकेच्या नजरेखाली होतील. औषधे ऑनलाईन होम डिलिव्हरी, आरटी-पीसीआर होम नमुना संकलन, शरीराचे तापमान, रक्तदाब, नाडी दर तपासणी नर्सच्या देखरेखेखाली असेल. घरातील स्वच्छतेपासून सर्व माहिती, कोविड 19 मेडिकल किटसोबत डिजिटल थर्मामीटर आणि डिजिटल ब्लड प्रेशर मशीन यांचा समावेश या पॅकेजमध्ये असेल.

होम क्वारंटाईनचे नियम

सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घेणे गरजेचे आहे की काही थोडी लक्षणे अथवा सुरवातीची लक्षणे आढळल्यास होम क्वारंटाईन गरजेचे आहे. आता प्रश्न असा आहे की होम क्वारंटाईनच्या कालावधीत कुटुंबापासून वेगळे रहावे लागते? जर तुमच्या घरी वेगळी राहण्याची व्यवस्था असेल तर तुम्ही कुटुंबासोबत राहू शकता. नवीन नियमांनुसार, सांगितले गेले आहे की होम आयसोलेशन पिरियड संपल्यानंतर रुग्णाला टेस्ट करणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही तुमच्या समाधानासाठी तुमच्या खर्चावर ही टेस्ट करू शकता की तुम्ही निगेटिव्ह झाला आहात.

10 दिवसांत समाप्त होऊ शकते आयसोलेशन

होम आयसोलेशनच्या काळात कुटुंबांच्या बाकी सदस्यांच्या सोबत कपडे, भांडी याशिवाय तुमच्या वापरातील इतर वस्तू शेर करू नका. वेगळे रहा आणि पौष्टिक आहार घेत रहा. तुम्ही आणि तुमच्या परिवाराने स्वच्छता राखून तीन लेयर वाले मास्क वापरले पाहिजे, ज्याला 8 तासांमध्ये बदलले पाहिजे. जर तीन दिवस सलग ताप नसेल तर 10 दिवसांनी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर रुग्णांचा होम आयसोलेशन समाप्त होऊ शकतो.