दिलासादायक ! आता 60 मिनिटात क्लियर होतील कोविड रूग्णांचे कॅशलेस क्लेम, विमा कंपन्यांना निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोविड 19 शी संबंधित कोणत्याही हेल्थ इन्श्युरन्स क्लेमचा 60 मिनिटे म्हणजे एक तासाच्या आत निपटारा करावा. दिल्ली हायकोर्टच्या या प्रकरणात गुरुवारी आलेल्या एका आदेशानंतर इरडाईने हे निर्देश दिले आहेत.

दिल्ली हायकोर्टाचा आदेश

दिल्ली हायकोर्टाने असा आदेश दिला होता की, इराडाईने विमा कंपन्यांना कॅशलेस क्लेमवर त्वरित पद्धतीने निपटारा करण्याचे आदेश द्यावेत. इरडाईने सर्व विमा कंपन्यांना सांगितले आहे की, त्यांनी याबाबत सर्व संबंधीत पक्षांना माहिती द्यावी की, कोविड रूग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर आणि सर्व आवश्यक कागदपत्र जमा केल्यानंतर एका तासाच्या आत कॅशलेस क्लेमचा निपटारा केला पाहिजे.

रूग्णांना मिळेल दिलासा

यामुळे तमाम कोरोना रूग्णांना दिलासा मिळेल आणि हॉस्पिटलमध्ये बेडची समस्या दूर करण्यात सुद्धा मदत मिळेल, कारण रूग्णांना डिस्चार्ज करणे आणि नवीन रूग्णांना दाखल करणे सोपे होईल.

इरडाईने म्हटले की, हायकोर्टाने हे निर्देश दिले आहेत की, कोविड- 19 चा कॅशलेस क्लेम 30 ते 60 मिनिटांच्या आत मंजूर केला जावा, जेणेकरून रूग्णांना डिस्चार्ज करण्यात उशीर होणार नाही आणि बेड रिकामा मिळेल.

यापूर्वी इरडाईने हा निर्देश दिला होता की, दोन तासांच्या आत कॅशलेस क्लेमचा निपटारा करावा. देशात कोरोनाची दुसरी लाट खुपच भयंकर ठरत आहे. हॉस्पिटलमध्ये खुप गर्दी आहे लोकांना बेड मिळत नाहीत. अशावेळी विमासंबंधी क्लेम मंजूर करण्यात उशीर झाल्यास समस्या आणखी वाढत आहे.