लखनऊमध्ये रूग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टरला झाला कोरोना, आतापर्यंत 148 केस

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका निवासी डॉटरला संसर्ग झाला आहे. हा डॉक्टर पीडित रूग्णावर उपचार करत होता. डॉक्टरच्या शरीरात कोरोनाची लक्षणे दिसून येत होती, यानंतर टेस्ट केली असता टेस्ट पॉझिटीव्ह आली. या डॉक्टरला आयसोलेशन वार्डमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. यासोबतच रूग्णांचा आकडा 148 झाला आहे.

स्टाफची सुद्धा करण्यात आली कोरोना टेस्ट

केजीएमयू आयसोलेशन वॉर्डचे इन्चार्ज डॉ. हिमांशु यांनी सांगितले की, आमच्या टीमच्या एका डॉक्टरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यासोबतच अन्य सर्व डॉक्टर आणि स्टाफने आपआपली टेस्ट केली. सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. कोरोना पेशन्ट डॉक्टरला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

याप्रकरणा सोबतच लखनऊमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे हे तिसरे प्रकरण आहे. तर उत्तर प्रदेशातील संक्रमित लोकांची संख्या 17 वर पोहचली आहे. बुधवारी नोएडामत एक आणखी कोरोनाचे प्रकरण समोर आले आहे. अशाप्रकारे तेथे कोरोनाची एकुण 4 प्रकरणे झाली आहेत. भारतात आतापर्यंत या व्हायरची 148 लोकांना लागण झाली आहे.