covid-19 Lambda Variant | व्हॅक्सिनलाही मात देतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट, वैज्ञानिकांनी ‘या’ गोष्टीचा दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा C.37 स्ट्रेन ज्याला लॅम्बडा व्हेरिएंट (covid-19 Lambda Variant) असं नाव आहे. हा व्हेरिएंट आता वेगाने पसरत आहे. लॅम्बडा व्हेरिएंट (covid-19 Lambda Variant) आता वेगाने पसरत असून पेरुमध्ये साधारण 80 टक्के संक्रमणाच्या केसेस याच स्ट्रेनच्या आहेत. हा व्हेरिएंट गेल्या एक महिन्यात 27 पेक्षा जास्त देशांत पसरला आहे. वैज्ञानिकांनी सांगितले की, या व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढली आहे. यामुळे तज्ज्ञांनी लोकांना सावध आणि गाइडलाइन फॉलो (follow the guideline) करण्याचा इशारा दिला आहे.

हा स्ट्रेन वॅक्सीनेशन प्रति इम्यून

वैज्ञानिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे की, असं असू शकतं की कोविड-19 चा स्ट्रेन वॅक्सीनेशन प्रति इम्यून असेल आणि यावर वॅक्सीनचा (Vaccine) काहीच प्रभाव होणार नाही. कोरोनाच्या या स्टेनने पेरुमध्ये थैमान घातले असून दिवसेंदिवस या स्ट्रेनच्या केसेस वाढत आहेत.

पहिली केस पेरुमध्ये

कोरोना-19 च्या नव्या स्ट्रेन ज्याला लॅम्बडा व्हेरिएंट असे नाव देण्यात आले आहे. याची सर्वात पहिली केस डिसेंबर 2020 मध्ये पेरुमध्ये समोर आली होती. तेव्हा कोरोनाच्या एकूण केससमध्ये या व्हेरिएंटमुळे संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 1 टक्का होती. एका वृत्तानुसार, सध्या पेरुमध्ये 80 टक्के नव्या केसेस याच व्हेरिएंटच्या आहेत आणि हा 27 पेक्षा जास्त देशात पसरला आहे.

चीनची कोरोना वॅक्सीन घेतलेले संक्रमीत

सँटियागोच्या यूनिव्हर्सिटी आणि चिलीने लॅम्बडा स्ट्रेनचा प्रभाव अशा वर्कर्सवर पाहिला, ज्यांना
चीनची कोरोना वॅक्सीन कोरोनावॅकचे (Coronavac vaccine) दोन डोज दिले गेले होते.या
रिसर्चनुसार लॅम्ब्डा व्हेरिएंट गामा आणि अल्फा पेक्षा जास्त संक्रामक आहे. या व्हेरिएंटवर वॅक्सीन
घेतल्यावर तयार झालेल्या अँटीबॉडीजचा (Antibody) काहीच प्रभाव होत नाही.

या स्ट्रेनमध्ये वेगवेगळे बदल

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, या स्ट्रेनमध्ये वेगवगेळ्या प्रकारचे बदल झाले आहेत. ज्यामुळे हा व्हेरिएंट जास्त संक्रामक झाला असून अँटीबॉडीजचाही यावर काहीच प्रभाव पडत नाहीये. ह्यूमन सेल्सना संक्रमित करणारा लॅम्ब्डा व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये सात म्यूटेशनचा एक खास पॅटर्न असतो.

हे देखील वाचा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 268 नवीन रुग्ण, 226 जणांना डिस्चार्ज

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : covid 19 lambda variant new strain killing vaccine impact

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update