Covid-19 Pneumonia symptoms : रूग्णांसाठी जीवघेणा ठरत आहे ’कोविड-19 निमोनिया’, जाणून घ्या याची 15 लक्षणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसच्या बहुतांश लोकांमध्ये खोकला, ताप आणि श्वासाचा त्रास अशी हलकी किंवा मध्यम लक्षणे असतात. परंतु कोरोना व्हायरसचे नवीन रूप आल्यानंतर लक्षणे बदलली आहेत आणि आता रूग्णांच्या दोन्ही फुफ्फुसांमध्ये गंभीर निमोनिया सुद्धा दिसून येत आहे. यास कोविड-19 निमोनिया म्हटले जात आहे जो एक गंभीर आजार आहे आणि जीवघेणा होऊ शकतो.

निमोनिया काय आहे?

निमोनिया एक फुफ्फुसांचा संसर्ग आहे जो फुफ्फुसांच्या आत हवेच्या एका छोट्या पिशवीत सूजेचे कारण ठरतो. यामध्ये इतका जास्त द्रव पदार्थ आणि पू भरू शकतो की, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. श्वासाची गंभीर कमतरता, खोकला, ताप, छातीत वेदना, थंडी लागणे किंवा थकवा होऊ शकतो. कोरोनाच्या निमोनियाला नोवेल कोरोना व्हायरस-इन्फेक्टेड निमोनिया (एनसीआयपी) म्हटले जात होते. डब्ल्यूएचओने त्याचे नाव बदलून कोविड-19 केले.

कोविड-19 निमोनियाची लक्षणे

ताप, सूका खोकला आणि श्वास घेण्यास त्रास ही सुरूवातीची सामान्य लक्षणे आहेत. याशिवाय याच्या लक्षणात थकवा, थंडी वाजणे, मळमळ किंवा उलटी, अतिसार, पोटात वेदना, मांसपेशी किंवा शरीरात वेदना, डोकेदुखी, वास आणि चव क्षमता जाणे, घशात खवखव, वाहते नाक, गुलाबी डोळे आणि त्वचेवर चट्टे इत्यादीचा समावेश आहे.

कोविड-19 निमोनिया झाल्यास धडधड वाढणे, श्वासाला त्रास किंवा धाप लागणे, चक्कर येणे आणि घाम सुटणे यासारख्या समस्या होऊ शकतात.