Covid-19 Vaccine | भारताने मोडला लसीकरणाचा आपलाच विक्रम, एका आठवड्यात दिल्या सुमारे 4 कोटी व्हॅक्सीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात या आठवड्यात आतापर्यंत सुमारे चार कोटी लोकांना व्हॅक्सीन (Covid-19 Vaccine) दिली गेली आहे. सरकारच्या कोविन पोर्टलवर (Cowin Portal) जारी ताज्या डेटानुसार, देशाने एप्रिलचा रेकॉर्ड (Vaccination Record) तोडत एक नविन यश मिळवले आहे. 21 जूनपासून नवीन गाईडलाईन्ससह सुरू झालेल्या लसीकरणाचा (Vaccination) चांगला प्रभाव दिसून येत आहे. covid-19 vaccine | vaccination drive high nearly 4 crore record jabs this week

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

20 – 30 कोटी डोस देण्याची तयारी

जुलैपासून व्हॅक्सीन प्रोग्रामचा वेग आणखी वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तर, अधिकार्‍यांनी माहिती दिली की, सरकार जुलैमध्ये 20 आणि ऑगस्टमध्ये 30 कोटी डोस देण्याची तयारी करत आहे.

जूनमध्ये दिले 3.98 कोटी डोस

19-25 जूनच्या दरम्यान 3.98 कोटी डोस दिले गेले. हा आकडा 12-18 जूनला दिल्या गेलेल्या 2.12 कोटी व्हॅक्सीनपेक्षा सुमारे दुप्पट होता.
यापूर्वी एका आठवड्यात सर्वात जास्त 2.47 डोस 3-9 एप्रिलच्या दरम्यान देण्यात आले होते.
केंद्राने राज्यांकडून 18-44 वयोगटासाठी व्हॅक्सीन खरेदी करण्याचे काम परत
घेण्यापूर्वी 15-21 मेदरम्यान लसीकरण सर्वात खालच्या स्तरावर होते.
त्या दरम्यान केवळ 92 लाख डोस दिले गेले होते.

डिसेंबरपर्यंत 94 कोटी लोकसंख्येला डोस

याबाबत एका वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याने न्यूज18 शी चर्चा करताना विश्वास व्यक्त केला की, यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील 94 कोटीच्या सर्व प्रौढ लोकसंख्येला डोस दिले जातील.
जूनमध्ये एका आठवड्यात सुमारे चार कोटी व्हॅक्सीन व्हॅक्सीन उपलब्ध केल्याने रोज डोस देण्यात वाढ होताना दिसत आहे.
सरकार जुलै महिन्यात 20 कोटी आणि ऑगस्ट महिन्यात 30 कोटी लोकांच्या लसीकरणाची तयारी करत आहे.

सर्वात जास्त मागणी 18-44 वयोगटासाठी

या आठवड्यात देण्यात आलेल्या 3.98 कोटी डोसपैकी सुमारे 70 टक्के 18-44 वयोगटाला दिले गेले आहेत. यामध्ये 89 टक्के पहिल्या डोसच्या रूपात लोकांना देण्यात आले आहेत.
सरकार दुसर्‍या डोससोबत 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या लसीकरणांवर जोर देत आहे.
परंतु या दरम्यान सर्वात जास्त मागणी 18-44 वयोगटाच्या डोससाठी येत आहे.

लवकरच युपी (UP) जाऊ शकते महाराष्ट्राच्या पुढे

देशात सर्वात जास्त व्हॅक्सीन देणाच्या बाबतीत सर्वात पुढे असलेल्या महाराष्ट्राला (Maharashtra) उत्तर प्रदेश पुढील आठवड्यापर्यंत मागे टाकू शकतो.
युपीत आतापर्यंत 2.99 कोटी डोस आणि महाराष्ट्रात 3.03 कोटी डोस दिले गेले आहेत.

अनेक राज्यांना लसीचा कमी पुरवठा

युपीत रोज 7-8 लाख लोकांना व्हॅक्सीन दिली जात आहे.
तर, महाराष्ट्रात हा आकडा 5 लाख प्रति दिवसावर आहे.
राजस्थानने सुद्धा सरकारला म्हटले आहे की, जर योग्य पुरवठा झाला तर ते रोज 15 लाख लोकांना व्हॅक्सीन देऊ शकतात. अनेक राज्यांकडे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी यंत्रणा उपलब्ध आहे,
मात्र लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लसीकरण संथ होत आहे.
राजस्थानने हेच कारण सांगितले आहे.

Web Title : covid-19 vaccine | vaccination drive high nearly 4 crore record jabs this week

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Anil Deshmukh | 100 कोटींचे वसुली प्रकरण : अनिल देशमुख यांच्या 2 स्वीय सहाय्यकांना अटक