अगोदर मोफत लस देण्याची घोषणा, काही वेळातच आरोग्यमंत्र्यांचा ‘यू-टर्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात लसीकरणाची तयारी सुरु असून, शनिवारी (दि.2) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रचना आढावा घातला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात कोरोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचे सांगत देशातील जनतेला सुखद धक्का दिला. केंद्राकडून झालेल्या या घोषणेचं स्वागत होत असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी यु-टर्न घेतला. पहिल्या टप्प्यातच कोरोना लस मोफत (Corona vaccine free) दिली जाणार असल्याचे सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबाबत खुलासा केला.

सीरम इन्स्टिट्यूच्या कोविडशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्व तयारी देखील सुरु केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीसंदर्भात मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली. परंतु काही वेळातच त्यांनी सगळ्यांना मोफत लस दिली जाणार नसल्याचे सांगत घूमजाव केलं.

देशात लस मोफत दिली जाणार असल्याचे वृत्त देशभरात पसरल्यानंतर आरोग्य मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव केली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस मोफत दिली जाणार आहे. देशभरात लस पुरवली जाणार आहे. 1 कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि 2 कोटी कोविड काळात पहिल्या फळीत काम करणाऱ्यांना लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. प्राधान्यक्रमातील 27 कोटी लाभार्थ्यांना लस कशी दिली जाईल. याचा तपशील जुलै पर्यंत निश्चित केला जाणार असल्याचे सांगत डॉ हर्षवर्धन यांनी मोफत लसीच्य घोषणेवर सारवासारव केली.

अफवांवर विश्वास ठेवू नका

देशातली नागरिकांना मी आवाहन करतो की, कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. सुरक्षितता आणि लसीची कार्यक्षमता याची खात्री करणे, याला आमचं प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. मात्र लोकांनी पोलिओची लस घेतली आणि देश पोलिओमुक्त झाला. असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.