Covid Symptoms | ‘या’ आयुर्वेदिक औषधाने 7 दिवसात ठिक होऊ शकतात कोरोनाची लक्षणे, संशोधनात आढळला पुरावा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Covid Symptoms| कोरोना (corona ) काळात आयुर्वेद तज्ज्ञांनी संशोधन (Research in Ayurveda latest) आणि अनेक अभ्यासांच्या आधारावर एक असे औषध सादर केले आहे, ज्यामध्ये एक आठवड्यात कोरोनाची लक्षणे (Covid Symptoms) ठिक होऊ शकतात, असा दावा केला जात आहे.
विशेष म्हणजे यासंबंधी करण्यात आलेल्या अनेक अभ्यासांमध्ये सुद्धा शास्त्रज्ञांना चांगले परिणाम दिसून आले आहेत.
या औषधाबाबत सविस्तर जाणून घेवूयात…Covid symptoms can be cured in seven days by ayush 64 medicine expert

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

कोरोना आणि आयुर्वेद
कोरोनात आयुर्वेदिक उपचार (Ayurvedic treatment) पद्धती खुप परिणामकारक ठरू शकते. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थे (All India Institute of Ayurveda) चे संचालक
डॉ. तनुजा नेसरी (Director Dr. Tanuja Nesri) सांगतात की, आयुर्वेदात अशी अनेक औषधे आहेत जी चवीला कडू असतात पण कोरोना उपचारा (Corona treatment) त परिणामकारक ठरत आहेत.

तुळस, (Tulsi)  गुळवेल,(gulvel) अश्वगंधा,(Ashwagandha) कडूलिंब,(Neem) मुलेठी (Liquorice) सारखी औषधे इम्यूनिटी (Immunity) वाढवण्यासाठी सहायक आहेत,
तसेच यातील अँटीवायरल (Antivirus) गुण संसर्ग कमी करण्यात सुद्धा खुप महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
याच औषधांवर अधारित संशोधनाच्या आधारावर शास्त्रज्ञांनी कोरोना काळात आयुष-64 औषध लोकांसाठी उपलब्ध केले, ज्याचे अद्भुत परिणाम दिसून आले.

आयुष-64 औषध कोरोनात लाभदायक

सीसीआरएएस (CCRAS) चे संचालक जनरल डॉ. एन. श्रीकांत (General Dr. N. Srikanth) यांनी सांगितले की, अलिकडच्या काही वर्षात आयुष मंत्रालया (Ministry of AYUSH) ने पुराव्यावर आधारित उपचार सादर करण्याच्या मार्गाने वेगाने काम केले.
आयुष मंत्रालयाने आयुष रिसर्च अँड डेव्हलपमेंट टास्क फोर्स गठित केला आहे, तो प्रो. भूषण पटवर्धन यांच्या नेतृत्वात संचालित केला जात आहे.
या कमिटीने अनेक औषधांचे परिक्षण केले.
यामध्ये कोरोना रूग्णांसाठी आयुष-64 औषध सादर केले आहे.

6-7 दिवसात कमी होऊ शकतात लक्षणे
डॉ. एन. श्रीकांत यांनी सांगितले की, आयुष-64 च्या संशोधनात शास्त्रज्ञांना आढळले की, या औषधाचे सेवन कोरोनाच्या असिम्टोमॅटिक ते माईल्ड-मॉडरेट रूग्णांसाठी खुप लाभदायक ठरू शकतो.
रुग्णांना स्टँडर्ड केयरसह आयुष-64 औषध दिल्याने मोठा लाभ होत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

हे औषध घेतल्याने 6-7 दिवसात कोविड-19 ची लक्षणे कमी होताना दिसून आली आहेत.
एक आठवड्यापर्यंत या औषधाचे सेवन करणार्‍या लोकांची आरटी-पीसीआर सुद्धा निगेटिव्ह आल्याचे आढळले आहे.

पोस्ट कोविड लाभ (Post Covid)
डॉ. एन. श्रीकांत यांनी सांगितले की, अनेक संस्थांसोबत मिळून कोरोनाच्या उपचारासंबंधीत आतापर्यंत 122 क्लिनिकल स्टडी करण्यात आले आहेत.
यामध्ये कोविड-19 सारख्या रोगाचा प्रतिबंध आणि मॅनेजमेटने संबंधित 60 अभ्यासांचा समावेश आहे. या अभ्यासांदरम्यान रूग्णात आयुष-64 औषधाचे स्पष्ट लाभ दिसून आले.

या औषधाबाबत करण्यात आलेल्या अभ्यासाचे प्री-प्रिंट सुद्धा प्रकाशित केले आहे. विशेष म्हणजे या औषधाने केवळ कोरोनाच बरा होत नाही तर कोरोनाच्या नंतर होणार्‍या असंख्य समस्या (झोप आणि पोटाच्या समस्या, तणाव, धडधड) सुद्धा दूर केल्या जाऊ शकतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : Covid symptoms can be cured in seven days by ayush 64 medicine expert

हे देखील वाचा

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Green Fungus | कोरोनातून रिकव्हर होत असलेल्या रुग्णांना ग्रीन फंगसचा धोका, जाणून घ्या याची 4 लक्षणे

Kiss करण्याने होऊ शकतात ‘हे’ 5 गंभीर आजार, जाणून घ्या Lip आणि French किसचे साईड इफेक्ट