कोरोनाची व्हॅक्सीन घेतल्याने मृत्यूचा धोका? नोबेल विजेत्याच्या वायरल मेसेजचे ‘हे’ आहे सत्य

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीदरम्यान सोशल मीडियावर अनेक प्रकारचे दावे वायरल होत आहेत. व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने शेयर केले जात असलेल्या एका मेसेजमध्ये असे म्हटले जात आहे की, ज्यांनी कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे, त्यांचा जीव धोक्यात आहे.

लाईफसाईट नावाच्या कॅनडाच्या एका वेबसाईटने नोबल विजता आणि फ्रेंच वायरलॉजिस्ट लूच मॉन्टेनियर यांच्या हवाल्याने एक बातमी छापली आहे. त्यानुसार, नोबल विजेत्याने मोठ्या प्रमाणात होत असलेल्या व्हॅक्सीनेशनबाबत सावध केले आहे आणि म्हटले आहे की, व्हॅक्सीन घेणे ऐतिहासिक चूक होईल, कारण यातून नवीन व्हेरिएंट निर्माण होत आहेत. या व्हेरिएंट्समुळे आणखी मृत्यू होतील.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, फ्रान्सचे वायरलॉजिस्ट ने आपल्या दाव्याबाबत अँटीबॉडी-डिपेंडंट एन्हँसमेंट म्हणजे एडीईच्या सिद्धांताचा संदर्भ दिला आहे. 2008 मध्ये नोबल जिंकणार्‍या प्रोफेसर मोंटानियर यांचे म्हणणे आहे की, व्हॅक्सीनमुळे नवीन व्हेरिएंट निर्माण होतील.

वायरल वृत्तात म्हटले आहे की, व्हॅक्सीन घेतल्यानंतर अँटीबॉडी तयार होते ज्यामुळे व्हायरससाठी ‘करो या मरो‘ची स्थिती तयार होते. व्हायरस आपले अस्तित्व वाचवण्यासाठी दुसरे मार्ग शोधू लागतो आणि याच स्थितीत नवीन व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र, जगातील अनेक शास्त्रज्ञांनी ही म्हणणे फेटाळले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हॅक्सीन घेतल्याने अँटीबॉडीमुळे नवीन व्हेरिएंट बनतात हे म्हणणे निराधार आहे. मेडपेज टुडेमध्ये प्रसिद्ध आर्टिकलमध्ये सुद्धा शास्त्रज्ञांनी ही शक्यता चुकीची असल्याचे म्हटले आहे.

सायन्स ट्रन्जिशनल मेडिसिन ब्लॉग ’इन द पाईपलाईन’मध्ये प्रोफेसर डेरेक लोवे यांनी लिहिले आहे, कोरोनाच्या व्हॅक्सीनच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात शास्त्राज्ञांनी सार्स-कोविड-2 च्या प्रोटीनच्या त्याच भागाला निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे एडीई (अँटीबॉडी-डिपेंडंट एन्व्हँसमेंट) होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर होती. शास्त्रज्ञांनी जनावरांवर सुद्धा याची चाचणी केली आणि ह्यूमन ट्रायलमध्ये सुद्धा. अजूनपर्यंत अशा कोणत्याही धोक्याचे संकेत दिसून आले नाहीत.

त्यांनी म्हटले, याबाबत काहीही शंका नाही की, व्हॅक्सीनेटेड लोकांमध्ये कोरोना संसर्गाची गंभीर प्रकरणे दिसून येत नाहीत. व्हॅक्सीनेशन नंतर लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची आवश्यकता भासत नाही. जर एडीईची गोष्ट खरी असती तर असे झाले नसते. नोबेल विजेता लूच मॉन्टेनियर यापूर्वी सुद्धा व्हॅक्सीनबाबत आपल्या दाव्यांमुळे वादात सापडले होते. त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमधून निघाला आहे जिथे चीनी शास्त्रज्ञ एचआयव्हीची व्हॅक्सीन बनवण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी हे सुद्धा म्हटले होते की, एचआयव्ही रेट्रोव्हायरसचे एलिमेंट नवीन कोरोना व्हायरसमध्ये सुद्धा आहेत. प्रसिद्ध सायन्स मॅगझीन नेचरने शास्त्रज्ञाच्या या दाव्याला पूर्णपणे चुकीचे म्हटले होते.