‘कोविडशील्ड’ लस घेतलेल्या व्यक्तीचा दावा – ‘आरोग्यावर झाला वाईट परिणाम’; ‘सिरम’नं सांगितली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – चेन्नईमध्ये परीक्षण सुरू असताना ‘कोविडशील्ड’ लस घेतलेल्या 40 वर्षांच्या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाउन आणि कमकुवत विचारसरणीची तक्रार करत सिरम संस्थेला आणि इतरांना कायदेशीर नोटीस पाठवून पाच कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. त्याचबरोबर लशीची तपासणी थांबविण्याची मागणी केली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सिरमने या व्यक्तीचे आरोप फेटाळून लावले आहेत.

सिरम इन्स्टिट्यूटने म्हटले आहे की, “नोटिसात केलेले आरोप द्वेषयुक्त व खोटे आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे, लस चाचणीचा स्वयंसेवकांच्या वैद्यकीय स्थितीशी काही संबंध नाही. कोविड लसीकरणाच्या वैद्यकीय समस्येबद्दल स्वयंसेवक खोटे आरोप करीत आहेत. ”

सिरम संस्थेने म्हटले आहे की, “हा दावा दुर्भावनायुक्त आहे, कारण वैद्यकीय कार्यसंघाद्वारे स्वयंसेवकांना खासकरून सांगितले गेले होते की, त्यांना ज्या समस्या आल्या होत्या, त्या वॅक्सीन ट्रायलमध्ये स्वतंत्र होत्या. ज्यामधून ते गेले होते. विशिष्ट माहिती दिल्यानंतरही त्यांनी पब्लिकमध्ये जाण्याचे ठरवले आणि कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहाेचवला. “सिरम इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे की, अशा दुर्भावनायुक्त माहितीच्या प्रसारामागील काही विशिष्ट हेतू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या व्यक्तीचा असा आरोप आहे की, लसीकरणानंतर त्याला तीव्र एन्सेफॅलोपॅथी, मेंदूला वेदना होण्यासारख्या समस्येचा सामना करावा लागला होता आणि लशीच्या चाचणीमुळे त्याचे आरोग्य बिघडले आहे, याची सर्व तपासणीद्वारे पुष्टी झाली आहे. या व्यक्तीला 1 ऑक्टोबर रोजी लसीकरण करण्यात आले होते. आरोप करणाऱ्या व्यक्तीने ही लस असुरक्षित म्हणून तपासणी, उत्पादन व वितरण रद्द करण्याची मागणी केली आहे आणि ती न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

कोविडशील्ड लस तयार करण्यासाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि औषध कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाशी करार केलेल्या पुणेस्थित इंडियन सिरम इन्स्टिट्यूटला (एसआयआय) कायदेशीर नोटीस पाठविली आहे. एसएसआय व्यतिरिक्त, या लशीचे प्रायोजक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि त्या व्यक्तीला लस देणाऱ्या उच्च शिक्षण व संशोधन संस्थेलाही नोटीस पाठविली आहे.