Cricket Entry In Olympics | आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश, 128 वर्षानंतर प्रथमच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Cricket Entry In Olympics | २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मुंबईत झालेल्या बैठकीनंतर घेतला आहे. शुक्रवारी आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ही मोठी घोषणा केली. (Cricket Entry In Olympics)

लॉस एंजेलिस समितीने ऑलिम्पिकमध्ये समावेश होऊ शकणाऱ्या ५ खेळांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. यानंतर आज क्रिकेटला ऑलिम्पिकसाठी मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे शेवटच्या वेळी साल १९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने झाले होते. (Cricket Entry In Olympics)

लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकच्या आयोजकांनी सोमवारी १२८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची शिफारस केली होती. आयओसीने उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या प्रस्तावाची माहिती देणारे निवेदन ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केले.

दोन वर्षांच्या प्रक्रियेदरम्यान आयसीसीने लॉस एंजेलिस २०२८च्या ऑलिम्पिक समितीसोबत जवळून काम
केल्याचे सांगण्यात आले. भारताने तब्बल ४० वर्षांनंतर आयओसी बैठकीचे आयोजन केले आहे.
यापूर्वी आयओसीची ८६ वी बैठक १९८३ मध्ये दिल्ली येथे झाली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी, वारजे पोलिसांकडून सराईत गुन्हेगार गजाआड

Supriya Sule On SC Hearing | ‘…मला वाटले नव्हते की हा दिवस येईल’ – सुप्रिया सुळे

Chandrashekhar Bawankule On Baramati Lok Sabha | ‘बारामतीची जागा अजित पवारांना गेली तरी….’ – चंद्रशेखर बावनकुळे