ICC World Cup 2019 : टीम इंडिया फायनलमध्ये नसतानाही भारतीय फॅन्सची ‘या’ कारणांमुळं होतेय ‘चांदी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान भलेही सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले असले तरी भारतीय फॅन्स आणि चाहते यामधून देखील पैसे कमवत आहेत. ज्या प्रेक्षकांनी फायनलच्या सामन्यासाठी तिकीट खरेदी केले होते आत ते तिकीट विक्रीतून लाखो रुपयांचा फायदा मिळवत आहेत. इंग्लंडमध्ये भारतीय फॅन्सची संख्या इतर देशांच्या तुलनेत फार जास्त आहे. भारताच्या सामन्यात देखील विरोधी संघाचे फार कमी पाठीराखे उपस्थित असतात. भारतीय चाहत्यांना भारत फायनलमध्ये खेळेल अशी आशा होती. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे.

माध्यमांमध्ये समोर आलेल्या रिपोर्टनुसार भारत फायनलच्या रेसमधून बाहेर पडल्यानंतर आता तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. भारतीय चाहत्यांनी जवळपास अर्ध्या मैदानातील जागांची तिकिटे घेतली होती. त्यामुळे आता भारतीय फॅन्स आपली तिकिटे विकून पैसे कमवत आहेत. त्याचबरोबर भरपाई देखील वसूल करत आहेत. इंग्लंडबरोबरच न्यूझीलंडचे फॅन्स देखील वाटेल तितकी रक्कम मोजून हि तिकिटे विकत घेत आहेत. यावर न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशाम याने ट्विट करत भारतीयांना आवाहन केले आहे कि, थोड्याश्या फायद्यासाठी भारतीय चाहत्यांनी तिकिटे विकू नये. त्यांनी सामना पाहायला येऊन आम्हाला सपोर्ट करावा.

२५ टक्के महाग विकली जात आहेत तिकिटे
अष्टपैलू खेळाडू जिम्मी नीशाम याने भारतीयांना आवाहन केले आहे कि, तुम्ही तिकिटातून पैसे कमावण्याच्या ऐवजी एखाद्या क्रिकेट चाहत्याला ते तिकीट विकून त्याला सामना पाहण्याची संधी द्या. त्यामुळे तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून ९५-३९५ पाउंड किमतीची तिकिटे देखील १० हजार पाउंड पर्यंत विकली जात आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा