ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीवर विराट कोहलीने दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. यानंतर आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. काल न्यूझीलंडविरुद्ध झालेला सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता, असे बोलले जात आहे. मात्र याविषयी अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

भारताचा कर्णधार विराट कोहली याने देखील धोनीच्या निवृत्तीवर भाष्य करताना म्हटले आहे कि, मला स्वतःला यासंदर्भात अजून काहीही माहिती नाही. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला धोनीच्या निवृत्तीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्याने हे म्हटले आहे. पत्रकारांनी यावेळी कोहलीला विचारले कि, धोनी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर येणार आहे का ? त्याचबरोबर धोनी निवृत्ती साकारणार आहे कि नाही यावर देखील प्रश्न विचारण्यात आला.

या वर्ल्डकप आधी अशी चर्चा होती कि, धोनीचा हा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली होती कि, या वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा शेवटचा सामना हा महेंद्रसिंग धोनी याचादेखील शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे धोनी निवृत्ती घेणार कि नाही याकडे सर्व क्रीडा रसिकांचे लक्ष लागून आहे. मात्र त्यानंतर एका मुलाखतीत धोनीने हे स्पष्ट केलं होते कि, त्याला स्वतःला देखील तो कधी निवृत्त होणार याची माहिती नाही. धोनीला हा वर्ल्डकप जिंकून शानदार निरोप देण्याचा भारतीय संघाचा इरादा होता, मात्र कालच्या पराभवाने भारतीय संघाच्या या आशेवर पाणी फेरले.

दरम्यान, या वर्ल्डकप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्टइंडीजच्या दौऱ्यावर असून भारतीय संघ या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहेत.

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय

 

Loading...
You might also like