ICC World Cup 2019 : सेमीफायनलमधील पराभवानंतर ‘या’ ४ खेळाडूंचा ठरला हा शेवटचा वर्ल्डकप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल झालेल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव करत धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केला. भारताला न्यूझीलंडकडून ८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. २४० या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची वरची फळी ढेपाळली. त्यानंतर दडपण आलेला भारतीय संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. भारताच्या या पराभवाबरोबरच या पराभवाची कारणीमांसा होण्यास सुरुवात झाली आहे. काही जण विराट कोहलीच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर काही जण दिनेश कार्तिकला खेळवण्याचा निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र या सगळ्यात काही खेळाडू असे आहेत ज्यांचा हा शेवटचा वर्ल्डकप होता. यानंतर २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये हे खेळाडू खेळू शकणार नाहीत.

या खेळाडूंचा आहे शेवटचा वर्ल्डकप
icc, cricket, icc cricket world cup, mahendra singh dhoni, kedar jadhav, shikhar dhawan, dinesh karthik, आईसीसी, क्रिकेट, आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, शिखर धवन, दिनेश कार्तिक
१) महेंद्र सिंह धोनी
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा वर्ल्डकप आहे. २००७, २०११, २०१५ आणि २०१९ असे चार वर्ल्डकप धोनी भारतासाठी खेळाला. २०११ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकत इतिहास रचला होता. ३८ वर्षीय धोनी २०२३ मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये आपल्याला दिसणार नाही. काही दिवसांतच धोनी निवृत्तीची देखील घोषणा करू शकतो. त्यामुळे त्याला कशा प्रकारे निरोप दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वर्ल्ड कप २०१९ मध्ये प्रदर्शन : ९ सामन्यांमध्ये २७३ रन, सर्वाधिक धावा ५६ विंडीजविरुद्ध
एकदिवसीय कारकीर्द : ३५० सामने १०७७३ रन,  १० शतक,  सर्वाधिक धावा १८३ नाबाद

icc, cricket, icc cricket world cup, mahendra singh dhoni, kedar jadhav, shikhar dhawan, dinesh karthik, आईसीसी, क्रिकेट, आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, शिखर धवन, दिनेश कार्तिक
२) दिनेश कार्तिक
भारतीय संघाचा हा खेळाडू सध्या ३४ वर्षाचा असून पुढील वर्ल्डकपपर्यंत तो ३८ वर्षांचा होईल. ऋषभ पंत आणि इतर खेळाडू तोपर्यंत भारतीय संघात स्थान मिळवतील. त्यामुळे दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळणार नाही. त्यामुळे दिनेश कार्तिकचा वर्ल्डकप प्रवास इथेच थांबला आहे. यापुढेदेखील त्याला भारतीय संघात स्थान मिळणे अवघड आहे.
वर्ल्ड कप २०१९ मध्ये प्रदर्शन : ३ सामन्यांमध्ये १४ रन, सर्वाधिक धावा ८ बांग्लादेशविरुद्ध
एकदिवसीय कारकीर्द : ९४ सामने १७५२ रन, सर्वाधिक धावा ७९

icc, cricket, icc cricket world cup, mahendra singh dhoni, kedar jadhav, shikhar dhawan, dinesh karthik, आईसीसी, क्रिकेट, आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019, महेंद्र सिंह धोनी, केदार जाधव, शिखर धवन, दिनेश कार्तिक
३)केदार जाधव
भारतीय संघातील या अष्टपैलू खेळाडूचे वय सध्या ३४ वर्ष आहे. त्यामुळे पुढील वर्ल्डकपमध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. या स्पर्धेत देखील त्याला त्याच्या लौकिकाला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत त्याला फक्त सहा सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली.
वर्ल्ड कप २०१९ मध्ये प्रदर्शन : ६ सामन्यांमध्ये ८० रन, सर्वाधिक धावा ५२ अफगानिस्तानविरुद्ध
एकदिवसीय कारकीर्द : ६५ सामने १२५४ रन, २ शतक


४)शिखर धवन
भारताचा सलामीवीर शिखर धवन या स्पर्धेत फक्त दोनच सामन्यांत खेळू शकला. त्याने या स्पर्धेत पहिल्या सामन्यात ८ धावा केल्या मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार ११७ धावांची खेळी केली. अंगठ्याला जखम झाल्यामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. सध्या शिखर धवन ३४ वर्षाचा असून २०२३ पर्यंत तो भारतीय संघासाठी खेळणार कि नाही याची खात्री नाही. त्यामुळे त्याचा देखील हा शेवटचा वर्ल्डकप आहे.
वर्ल्ड कप २०१९ मध्ये प्रदर्शन : २ सामन्यांमध्ये १२५ रन, सर्वाधिक धावा ११७ ऑस्ट्रेलियाविरुद्ध
एकदिवसीय कारकीर्द : १३० सामने ५४८० रन, १७ शतक

त्याचबरोबर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या खेळण्यावर देखील शंका आहे. दोघेही सध्या फिट असले तरी २०२३ पर्यंत त्यांच्या खेळण्याविषयी सध्या काहीही सांगता येत नाही. त्यामुळे हा वर्ल्डकप त्यांचा शेवटचा ठरण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा