IPL 2020 : यावेळी ख्रिस गेल नव्हे तर मुंबई इंडियन्सचा ईशान किशन ‘सिक्सर किंग’, तोडला रेकॉर्ड

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – आयपीएलमध्ये जेव्हा सर्वाधिक षटकार मारण्याची चर्चा येते तेव्हा लोकांच्या तोंडात पहिले ख्रिस गेलचे नाव येते. गेलने आयपीएलच्या जवळपास प्रत्येक सीजनमध्ये सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 349 षटकार मारले आहेत. यावेळी गेलचा संघ पंजाब किंग्ज इलेव्हन प्लेऑफसाठी पात्र होऊ शकला नाही. त्यामुळे या वेळी मुंबई इंडियन्सचा 22 वर्षीय ईशान किशनने सर्वाधिक षटकारांच्या शर्यतीत मोठ-मोठ्या क्रिकेटपटूला मागे टाकले आहे. इशानने या सीजनमध्ये आतापर्यंत 29 षटकार मारले आहेत.

तोडला संजू सॅमसनचा रेकॉर्ड
आयपीएलच्या सध्याच्या सीजनमध्ये संजू सॅमसन जास्तीत जास्त षटकारांच्या शर्यतीत सगळ्यात पुढे होता. त्याने 14 डावात 26 षटकार मारले. पण ईशानने गुरुवारी दिल्ली कॅपिटलिस विरूद्ध 3 षटकार मारत सॅमसनचा रोकॉर्ड तोडला. आता ईशानने 29 षटकार मारले आहेत. या यादीत मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 25 षटकार मारले आहेत. तर गेलने यावर्षी फक्त 7 डावात 23 षटकार मारले होते.

ख्रिस गेलचे आयपीएलच्या सीजनमध्ये सर्वात जास्त षटकार मारण्याचा रेकॉर्ड आहे. 2012 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने 59 षटकार मारले होते. या यादीतील दुसर्‍या क्रमांकाचे नाव आहे जमैकाचा आणखी एक क्रिकेटर आंद्रे रसेल आहे. 2019 मध्ये केकेआरकडून खेळताना त्याने 52 षटकार मारले होते. तिसर्‍या क्रमांकावर गेलचेही नाव आहे. 2013 मध्ये त्याने आरसीबीकडून 51 षटकार मारले होते. तर आता ईशान किशन आयपीएलच्या सीजनमध्ये सर्वाधिक षटकारांच्या शर्यतीत 29 षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आला आहे.