‘हे’ 2 खेळाडू भारताला जिंकून देऊ शकतात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, गावस्करांनी उघड केले पीचचे रहस्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा सलामीचा महान फलंदाज सुनील गावस्करचे Sunil Gavaskar म्हणणे आहे की, साउथेम्टनच्या भीषण उन्हात न्यूझीलँडविरूद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये World Test Championship Final भारतीय टीममधून रवींद्र जडेजा Ravindra Jadeja आणि रविचंद्रन अश्विन Ravichandran Ashwin दोघांना उतरवले जाऊ शकते कारण पिच हळुहळु सुकल्यानंतर स्पिनर्सला मदत करेल.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

गावस्करने उघड केले पीचचे रहस्य
गावस्कर Sunil Gavaskar 18 जून पासून सुरू होत असलेल्या मॅचच्या कॉमेंट्री पॅनलचा भाग आहे आणि यावेळी साउथेम्टनमध्ये आहे. गावस्करने म्हटले, साउथेम्टनमध्ये मागील काही दिवसांपासून भीषण उन्हाळा आहे. अशावेळी पिच सूकले असेल आणि स्पिनर्सला मदत करेल. म्हणून अश्विन आणि जडेजा दोघे खेळू शकतात.

हे दोघे देऊ शकतात विजय
गावस्करने म्हटले की, केवळ गोलंदाजीच नव्हे तर सर्वप्रकारच्या क्षमतेच्या बळावर भारतीय टीममध्ये संतुलन दिसून येत आहे. गावस्करने म्हटले, अश्विन आणि जडेजा फलंदाजीला सुद्धा सखोलपणा देतात आणि गोलंदाजीत संतुलन आणतात. इंग्लंडच्या विरूद्ध नंतर होणार्‍या सीरीजमध्ये खुपकाही हवामान अणि पिचवर अवलंबून असेल.

भारतीय वंशाच्या सत्या नडेला यांची झाली बढती; ‘मायक्रोसॉफ्ट’ने आता CEO वरून बनवले चेयरमन

भारतीय टीमची तयारी मजबूत
इंग्लंडला मालिकेत पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचे मनोबल वाढलेले आहे,
परंतु गावस्करचे म्हणणे आहे की, सरावाचा सामना मिळालेला नसला तरी भारतीय टीमची तयारी मजबूत आहे.
सध्या दौर्‍यावर एक किंवा दोन सराव सामने होतात.
भारतीय खिळाडूंनी सराव सामना खेळलेल्या टीममध्ये तरुण आणि अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण केले आहे.
आणि बहुतांश खेळाडूंनी अनेकदा इंग्लंडचा दौरा केला आहे. त्यांना स्थितीची माहिती आहे.

अश्विन महत्वाची भूमिका पार पाडणार
अश्विन या दौर्‍यात आपल्या अनुभवातून महत्वाची भूमिका पार पाडेल.
गावस्करचे Sunil Gavaskar म्हणणे आहे की, तामिळनाडुच्या या स्पिनरला गोलंदाजी करताना पाहणे तेवढाच शानदार अनुभव आहे जेवढा इरापल्ली प्रसन्ना किंवा हरभजन सिंहला पाहण्यात आहे.
त्यांनी म्हटले, हे सर्व शानदार गोलंदाज आहेत.
प्रसन्नाला धुर्त कोल्हा म्हटले जात होते, कारण तो फलंदाजांना खराब शॉट खेळण्यासाठी उकसवण्यात तरबेज होता.
हरभजन सिंह सुद्धा चतुरपणे विविधता आणत असे.

अश्विनकडे कॅरम बॉल
गावस्करने म्हटले अश्विनकडे हे सर्व आहे आणि त्याने यामध्ये फ्लिकर किंवा कॅरम बॉलचा सुद्धा समावेश केला आहे जो खुपच शानदार आहे!
कर्णधार विराट कोहलीने 2018 च्या इंग्लंड दौर्‍यात शानदार कामगिरी केली होती,
परंतु इतर फलंदाज सीम आणि स्विंगच्या समोर सतत चांगले खेळू शकले नाहीत.

Wab Title : cricket legend sunil gavaskar explains because of this 2 cricketer india will win the world test championship

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

LIC CSL ने लाँच केले गिफ्ट कार्ड ’शगुन’, 10,000 रुपयांपर्यंत करू शकता शॉपिंग, जाणून घ्या डिटेल

Indian Developer | सोलापूरच्या विद्यार्थ्याने Instagram मधील चूक शोधली, Facebook ने दिले 22 लाखांचे बक्षीस