यावेळी सचिन, गांगुली नाही तर ‘हे’ तिघेजण निवडणार भारतीय ‘प्रशिक्षक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारतीय संघावर मोठ्या क्रीडा रसिक नाराज आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना देखील पदावरून हटवण्यात येणार असल्याचे माहिती मिळत आहे. त्याचबरोबर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांनी देखील आपली जबाबदारी उत्तमपणे पार पाडली नसल्याने त्यांच्यावर देखील नाराजी मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे यातील काही जणांवर देखील सुट्टी होण्याची टांगती तलवार आहे.

त्याचबरोबर यावेळी प्रशिक्षक निवडणाऱ्या समितीवर देखील काही बदल करण्यात येणार आहेत. यावेळी समितीमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या निवड समितीवर प्रशिक्षक निवडीची जबाबदारी न देता नवीन समितीवर ही जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हे तिघे निवडणार प्रशिक्षक

माध्यमांत समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि वीवीएस लक्ष्मण यांच्या समितीवर यावेळी हि जबाबदारी न देता नवीन समितीची स्थापना करून त्यांच्यावर हि जबाबदारी दिली जाणार आहे. या नवीन समितीत कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी या तिघांचा समावेश आहे. या तिघांनीच भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकाची निवड केली होती. त्यामुळे आता हे तिघे कुणाची नेमणूक करतात याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधी शास्त्रींची कधी सुट्टी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

रवी शास्त्रींना यावेळी हटवणार पदावरून

शास्त्री यांची जुलै २०१७ मध्ये या पदावर नेमणूक करण्यात आली होती. वर्ल्डकप २०१९ पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. मात्र सेमीफायनल मध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांना या पदावर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयच्या काही आधिकाऱ्यांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार लवकरच या पदासाठी अर्ज मागवण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शास्त्री या पदासाठी अर्ज करतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारतीय संघ या महिन्यात वेस्टइंडीज दौऱ्यावर जात असून या दौऱ्यानंतर नवीन प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

संजय बांगर यांना देखील मिळणार सुट्टी

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्या कामगिरीवर बीसीसीआय नाराज असल्याची माहिती मिळत आहे. संजय बांगर यांनी आपले काम चांगले केले नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. फलंदाजीमध्ये भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा तिढा शेवटच्या सामन्यापर्यंत सोडवता न आल्याने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे प्रशिक्षक संजय बांगर यांना यासाठी जबाबदार ठरवण्यात येत आहे. त्यामुळे बांगर यांना देखील नारळ मिळणार आहे.

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’