Pune News : मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीतील 5 जणांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकण्यासाठी तयारी करून थांबलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेने त्यांना पकडले आहे. कोंडीबा उर्फ नाना बाबू पांढरे (वय 35) प्रसाद आनंदा मालुसरे (वय 26) गणेश भीमा शिंदे (वय 30) आकाश भगवान दुधाळे (वय 23) व अविनाश राम निंबाळकर (वय 23) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार रुपेश वाघमारे (वय 47) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखा शहरात गस्त घालत आहे. तसेच सराईत गुन्हेगार व पाहिजे आरोपींची माहिती घेत आहेत. यावेळी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना काही लोक हे मार्केट येथील नंदनवन लॉज शेजारी असणाऱ्या गल्लीत दबा धरून बसल्याचे दिसले. तरी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता दरोडा टाकण्यासाठी लागणारे घातक धारदार शस्त्र, नायलॉन दोरी, मिरची पावडर असे सापडले. त्यानंतर पोलिसांनी या सर्वांना अटक केली. स्वारगेट पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 जानेवारी च्या रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.