Chakan News : पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक

चाकण/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्टल (pistol) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.9) सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण (Chakan) येथील आंबेठाण चौकात करण्यात आली.

महेश बाळु पडवळ (वय-20 रा. बसोदरा, पो. आंबेठाण, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस नाईक विठ्ठल बाजीराव सानप यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील आंबेठाण चौकामध्ये एक तरुण विनापरवाना पिस्टल घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आंबेठाण चौकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी 51 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चामले हे करीत आहेत.