Crime News | अनोळखी महिलेला तरुणानं मारली घट्ट मिठी; दादर रेल्वे स्टेशनवरील विचित्र प्रकार समोर

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   Crime News | अनेक रेल्वे स्टेशन अथवा एसटी स्टॅन्ड परिसरात तरुणी आणि महिलेची छेड काढल्याच्या घटना समोर येत असतात. मात्र, आता दादर रेल्वे स्टेशनवरील एक अजब प्रकार समोर आला आहे. दादर स्टेशनवर (Dadar Railway station) गर्दी ठिकाणी एका अज्ञात तरुणाने एका अनोळखी महिलेला घट्ट मिठी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वे स्थानक परिसरातून चालत असताना ही घटना घडली आहे. मिठी मारल्यानं संबंधित महिला देखील चक्रावून गेली होती. या अजब प्रकारानंतर तेथील रेल्वे पोलिसांनी आणि प्रवाशांनी पळत असलेल्या आरोपीचा पाठलाग करून पकडलं आहे. संजय यादव (वय, 28) असं त्या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी दादर पोलिसांत (Dadar Police Station) त्याच्याविरुद्ध गुन्हा (Crime News) दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी, पीडित महिला कल्याण (Kalyan) येथील रहिवासी आहे. ती महिला मध्य मुंबईत नोकरी करते. पीडित महिला गुरुवारी पावणेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे बदलापूर लोकल ट्रेन (Local train) पकडण्यासाठी फर्स्ट क्लास डब्याच्या दिशेने जात होती. या दरम्यान, आरोपी तरुण संजय यादव (Sanjay Yadav) पीडित महिलेच्या दिशेनं आला. पीडित महिलेला काही कळायच्या आत आरोपी संजयने अचानक त्या महिलेला घट्ट मिठी मारली. या घडलेल्या अजब प्रकारामुळे पीडित महिला गोंधळून गेली होती.

 

या दरम्यान, या प्रकरणानंतर आरोपी (Accused) पलायन होत होता.
तेवढ्यात रेल्वे पोलिसांनी आणि प्रवाशांनी आरोपी संजय यादवला पकडलं आहे.
याप्रकरणी पीडित महिलेनं दादर पोलीस ठाण्यात (Dadar Police Station) विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.
यावरून दादर पोलिसांनी आरोपी संजय यादवला अटक (Arrested) केली आहे.
आरोपी संजय यादव हा वडाळा (vadala) परिसरातील रहिवासी असून तो एक मजूर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान,आरोपीनं अनोळखी महिलेला मिठी मारून पळ काढण्याचा विकृत प्रकार केल्यानं दादर रेल्वे (Dadar Railways station) ठिकाणी काही काळ महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Crime News | young man hugged a stranger woman tightly at dadar railway station and run away

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Monsoon And Covid | ‘कोरोना’ आणि ‘मान्सून’संबंधी आजार कसे ओळखाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं म्हणणं

PAN | तुमच्या PAN चं चौथं अन् पाचवं ‘अक्षर’ असतं खुपच ‘विशेष’, जाणून घ्या यावरून काय समजतं

IMD Alert | अरबी समुद्रात वेगाने वारे वाहण्याची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार