पत्नीच्या समोर परस्त्रीशी संबंध ठेवणं क्रौर्य : उच्च न्यायालय

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

महिलांच्या होत असलेल्या छळा विषयी दिल्ली उच्च न्यायालयाने अाज (गुरुवार) महत्वपूर्ण दिला अाहे. यामध्ये पत्नीला जबरदस्ती दारु पाजणे व तिच्या समोर एखाद्या परस्त्रीशी संबंध ठेवणं हे क्रौर्य आहे. असे या निर्णयात म्हटले आहे. एका महिलेने तिच्या पती विरुध्द क्रूर वागणुकीवरुन कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, या महिलेच्या पतीने त्याचा भाऊ आणि नातेवाईकांच्या मदतीने तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. तिच्या पतीने तिला जबरदस्ती दारु पाजली आणि तिच्या समोरच दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवला. या जबाबवर संबंधित महिला कायम राहिली. त्यामुळे कनिष्ठ न्यायालयाने हा प्रकार गंभीर क्रौर्य असल्याचं स्पष्ट सांगत न्यायालयाने या महिलेच्या घटस्फोटाचा हुकूमनामा मंजूर केला.याविषयी संबंधित महिलेने दिलेल्या जबाबावर शंका उपस्थित करता येणार नाही. पतीच्या वागणुकीबाबत महिलेने दिलेली कबुली खरी आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.