क्रोकोडाईल हंटर स्टीव्ह आयर्विनला गुगलकडून अनोखी श्रद्धांजली

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – साप, मगर आशा प्राण्यांना पाहताक्षणी अनेकांची भंबेरी उडते मात्र या प्राण्यांसोबत लीलया मैत्री करणाऱ्या त्यांना प्रेमाने हाताळणाऱ्या स्वर्गीय स्टीव्ह आयर्विन यांनी आजच्याच दिवशी जगाला निरोप दिला होता. त्यांच्या जाण्याची बातमी जगभरातील प्राणीप्रेमींकरिता मनाला चटका लावून जाणारी होती. ‘क्रोकोडाईल हंटर ‘ स्टीव्ह आयर्विन’ यांना गुगलने अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.ऑस्ट्रेलिया येथील प्रसिद्ध प्रशुप्रेमी स्टीव्ह आयर्विन यांचे विशेष डुडल तयार करण्यात आले आहे. त्यांना मगरी आणि साप यांच्याविषयी खास प्रेम होते त्यामुळे त्यांना क्रोकोडाईल हंटर म्हणून देखील ओळखले जायचे. पशु पक्षांशी मैत्री करणाऱ्या स्टीव्ह आयर्विन यांच्या सन्मानार्थ १५ नोव्हेम्बर हा दिवस ‘स्टीव्ह आयर्विन डे’ म्हणून साजरा करण्यात येतो.

स्टीव्ह यांचा मृत्यू दुर्दैवी

तुम्ही अनेकदा डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक चॅन, अॅनिमल प्लॅनेट अशा वाहिन्यांवर स्टीव्ह आयर्विन यांचे शोज पाहिले असतील. पण दुर्दैवाची बाब अशी की ज्या स्टीव्ह आयर्विनने आपलं पूर्ण आयुष्य वन्य प्राण्यांसाठी व्यतीत केलं त्यांचा मृत्यू मात्र एका समुद्री प्राण्याच्या दंशाने झाला. त्यांचा मृत्यू २००६ साली ‘स्टिंग रे ‘ या माशाच्या दंशाने त्यांचा मृत्यू झाला होता. समुद्रातील एका अंडरवॉटर शुटिंगच्यावेळी त्यांना स्टिंग रे ने दंश केला होता. पण आता त्यांचा वारसा त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले चालवत आहेत.स्टीव्ह यांनी पत्नी टेरी यांच्यासोबत अनेक वाहिन्यांवर मगरींच्या जीवनाशी संबंधित ‘क्रोको फाइल्स’, ‘द क्रोकोडाइल हंटर डायरीज’ आणि ‘न्यू ब्रीड वेट्स’ आदी वाइल्डलाइफ डॉक्युमेंट्री सादर केल्या आहेत. इरविन यांनी अनेक वन्यजीव, पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध लावला आहे.

डूडलमध्ये अनेक स्लाइड्स तयार करून त्यातून इरविन यांचं पशू-पक्ष्यांबद्दलचं प्रेम अधोरेखित केलं आहे. ते कुटुंबवत्सलही होते हे स्लाइड्सद्वारे दाखवलं आहे. पशूप्रेमी असलेले इरविन हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-कीपर म्हणूनही कार्यरत होते. इरविन यांनी पत्नी टेरी यांच्यासोबत अनेक वाहिन्यांवर मगरींच्या जीवनाशी संबंधित ‘क्रोको फाइल्स’, ‘द क्रोकोडाइल हंटर डायरीज’ आणि ‘न्यू ब्रीड वेट्स’ आदी वाइल्डलाइफ डॉक्युमेंट्री सादर केल्या आहेत. इरविन यांनी अनेक वन्यजीव, पशूंच्या नव्या प्रजातींचाही शोध लावला आहे.

पहा स्टीव्ह आयर्विन आणि त्यांची पत्नी टेरी यांचा चित्तथरारक व्हिडीओ

You might also like