कोरोनाची तिसरी लाट होऊ शकते जास्त धोकादायक; CSIRच्या DG ने केला इशारा

तिरुवनंतपुरम : देशात कोरोनाच्या महामारीचे संकट अजून संपले नाही, असा इशारा विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे डीजी शेखर सी. मांडे यांनी रविवारी दिला. कोरोनाची तिसरी लाट येण्यासंबंधित बोलताना त्यांनी चेतावणी दिली की, जर तुम्ही तुमच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाला निमंत्रण देत असाल तर हा संसर्ग खतरनाक रूप घेऊ शकतो.

मांडे पुढे म्हणाले, सद्य स्थितीतून बाहेर येण्यासाठी संस्थानात सतत सहकार्य आणि त्यासोबत जलवायू परिवर्तन आणि परंपरागत इंधनांवर अवलंबित्व जास्त असल्याने निर्माण होणाऱ्या संकटाना टाळणे आवश्यक आहे. अशा संकटग्रस्त स्थितीमुळे संपूर्ण मानवतेला धोका होऊ शकतो. राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीद्वारे आयोजित केलेल्या डिजिटल कार्यक्रमात ते संबोधित करत होते. या कार्यक्रमाचा विषय कोविड-१९ आणि भारताची प्रतिक्रिया हा होता.

संक्रमणापासून वाचण्यासाठी मास्क वापरणे आवश्यक

पुढे मांडे म्हणाले, भारत अजूनही हर्ड इम्युनिटी प्राप्त करण्यापासून दूर आहे आणि अशा स्थितीत लोकांनी व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क घातले आवश्यक आहे. याशिवाय नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग , हॅन्ड सॅनिटायझर या नियमांचे पालन केले पाहिजे.
त्यांनी नागरिकांच्या बेजबाबदार वागण्याला आणि विज्ञानी समुदायाला चेतावणी देत असे सांगितले की, तिसरी लाट आली तर या परिस्थीशी सामना करणे कठीण जाईल. कोरोना वॅक्सीन व्हायरसपासून लढण्यासाठी प्रभावी असेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिल्लीमध्ये सद्य स्थितीत १,३३५ रुग्ण सक्रिय

आरोग्य विभागानुसार दिल्लीमध्ये आतापर्यंत एकुन ६ लाख ३९ हजार २८९ केसेस आल्या. त्यामध्ये ६ लाख २७ हजार ४४ रुग्ण बरे झाले. रुग्णांचा बरे होण्याचा दर ९८.०८ % आहे. मृतांची एकूण संख्या १०,९१० झाली आहे. दिल्लीमध्ये सद्य स्थितीत १,३३५ सक्रिय रुग्ण आहेत. यात ४४६ दवाखान्यात दाखल आहेत.