Currency Printing Rate List | RTI मध्ये खुलासा, 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांच्या छपाईचा रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Currency Printing Rate List | नोटाबंदी (Demonetisation) नंतर भारतात चलनात (Currency) बदल झाला आहे. पूर्वी 1000 रुपयांच्या नोटा येत होत्या, त्या आता बंद झाल्या असून आता 2000 रुपयांची सर्वात मोठी नोट छापली जात आहे. त्याचप्रमाणे आता सर्वात लहान नोट 10 रुपयांची आहे. (Currency Printing Rate List)

 

या गोष्टी जवळपास सगळ्यांनाच माहीत आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की या नोटांच्या छपाई (Currency Printing) वर आरबीआय (RBI) ला किती पैसे द्यावे लागतात ? वास्तविक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला 500 रुपयांच्या नोटांपेक्षा 200 रुपयांच्या नोटांच्या छपाईवर जास्त खर्च करावा लागतो. त्याचप्रमाणे 10 रुपयांची नोट छापण्यासाठी 20 रुपयांच्या नोटेपेक्षा जास्त खर्च येतो.

 

इतका आहे नोटांच्या छपाईचा खर्च

नोटांच्या छपाईच्या खर्चाची ही आकडेवारी माहिती अधिकारात समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोट मुद्रण लिमिटेड (BRBNML) ने आरटीआयच्या उत्तरात नोटा छपाईच्या खर्चाची माहिती दिली आहे. (Currency Printing Rate List)

आकडेवारीनुसार, 2021-22 (आर्थिक वर्ष 22) या आर्थिक वर्षात आरबीआयला 10 रुपयांच्या हजार नोटांच्या छपाईसाठी 960 रुपये मोजावे लागले, तर 20 रुपयांच्या हजार नोटा केवळ 950 रुपयांना छापण्यात आल्या. त्याचप्रमाणे 500 रुपयांच्या हजार नोटा छापण्यासाठी 2,290 रुपये मोजावे लागले, तर 200 रुपयांच्या इतक्या नोटा छापण्यासाठी 2,370 रुपये मोजावे लागले.

 

या छोट्या नोटांची छपाई महाग

माहितीनुसार, आरबीआयला गेल्या आर्थिक वर्षात 50 रुपयांच्या 1000 नोटा छापण्यासाठी 1,130 रुपये द्यावे लागले. त्याचप्रमाणे 100 रुपयांच्या एक हजार नोटा छापण्यासाठी 1,770 रुपये खर्च आला.

अशाप्रकारे, आरबीआयला 20 रुपयांच्या नोटांपेक्षा जास्त 10 रुपयांच्या नोटा आणि 500 रूपयांपेक्षा जास्त 200 रुपयांच्या नोटांची छपाई पडली. 2018-19 पासून 2000 रुपयांच्या नोटांच्या छपाईचा डेटा उपलब्ध नाही.

 

वाढला नाही 500 रुपयांच्या छपाईचा खर्च

आकडेवारीनुसार, 50 रुपयांच्या नोटांच्या छपाईचा दर गेल्या वर्षभरात सर्वाधिक वेगाने वाढला आहे.
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 50 रुपयांच्या हजार नोटा 920 रुपयांना छापल्या जात होत्या.
त्यांची किंमत एका वर्षात सुमारे 23 टक्क्यांनी वाढून 1,130 रुपये झाली.

त्याच वेळी, 20 रुपयांच्या नोटांच्या छपाईचा खर्च सर्वात कमी वाढला.
20 रुपयांच्या हजार नोटा 2020-21 मध्ये 940 रुपयांच्या छापल्या जात होत्या, ज्याची किंमत एका वर्षात सुमारे 01 टक्क्यांनी वाढून 950 रुपयांवर गेली.
या काळात 500 रुपयांच्या नोटांच्या छपाईचा खर्च कायम होता.

यादरम्यान 10 रुपयांच्या नोटांच्या छपाईचे दर कमी झाला.
यापूर्वी 10 रुपयांच्या हजार नोटा 990 रुपयांना छापल्या जात होत्या, तो खर्च 960 रुपयांवर आला आहे.
दुसरीकडे, 100 रुपयांच्या हजार नोटांच्या छपाईचा दर 1,640 रुपयांवरून 1,770 रुपयांपर्यंत वाढला आहे.
त्याचप्रमाणे 200 रुपयांच्या एक हजार नोटांच्या छपाईचा खर्च 2,220 रुपयांवरून 2,370 रुपयांपर्यंत वाढला आहे.

 

या शहरांमध्ये छापल्या जातात आरबीआयच्या नोटा

भारतात नोटांच्या छपाईचे काम चार प्रेसमध्ये केले जाते.
यापैकी दोन प्रेस आरबीआयच्या उपकंपनी BRBNML च्या आहेत, ज्या म्हैसूर आणि सालबोनी येथे आहेत.

त्याच वेळी, आणखी दोन प्रेस भारत सरकारच्या मालकीच्या आहेत, ज्या नाशिक आणि देवासमध्ये आहेत.
या दोन्ही प्रेस सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) च्या मालकीच्या आहेत.

तसेच नाणी पाडण्याचे कामही चार ठिकाणी केले जाते. नाण्यांची टांकसाळ केंद्रे मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा येथे आहेत.
ही चार केंद्रे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची आहेत.

 

Web Title :- Currency Printing Rate List | rbi currency printing cost of every denomination inches up reserve bank of india rti data

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा