LPG Cylinders : इंडेन, भारत गॅस आणि HP चे ग्राहक आहात? तर ही बातमी वाचाच…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –   जर तुम्ही इंडेन, भारत गॅस आणि एचपी (HP) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता तुम्ही अगदी सहजरित्या घरगुती गॅस सिलेंडर (LPG) बुक करू शकता. आता तुम्हाला बुकिंग करताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

भारत गॅस, इंडेन आणि एचपी या कंपनीच्या ग्राहकांना एका क्षणात WhatsApp आणि SMS च्या माध्यमातून गॅस बुकिंग करता येऊ शकतो. आपल्या ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

इंडेनचे ग्राहक असाल तर…

इंडेनचे ग्राहक 7718955555 वर कॉल करून LPG सिलेंडर बुक करू शकता. तसेच तुमच्या WhatsApp वर REFILL लिहून 7588888824 या नंबरवर मेसेज पाठवावा. हा मेसेज पाठवताना ग्राहकाला फक्त रजिस्टर्ड मोबाईल नंबरचाच वापर करावा लागेल.

भारत गॅसचे ग्राहक असाल तर…

भारत गॅसच्या ग्राहकाला फक्त रजिस्टर्ड मोबाईल नंबरचाच वापर करून 1800224344 वर कॉल करावा लागेल. त्यानंतर BOOK किंवा 1 टाईप करून मेसेज पाठवावा लागणार आहे. त्यानंतर याचा Confirmation मेसेजही गॅस एजन्सीकडून प्राप्त होईल.

HP चे ग्राहक असाल तर…

ग्राहक 9222201122 या क्रमांकावर WhatsApp वरून मेसेज करून LPG गॅस सिलेंडर बुक करू शकतात. तसेच ग्राहक रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरूनही मेसेज पाठवू शकतात. या क्रमांकावरून तुम्हाला इतरही काही माहिती मिळू शकते.