मडगावमधील ग्राहक वर्गाने घेतले अधिकाऱ्यांना फैलावर

मडगाव : पोलीसनामा ऑनलाईन – पोस्ट ऑफिसमध्ये भरलेल्या बीएसएनएलच्या बिलाची रक्कम पणजी कार्यालयात पोच न केल्याने ग्राहकांना दुप्पट बिल आले आहे. ही घटना मडगावात येथे घडली आहे. या प्रकारामुळे मडगावच्या बीएसएनएल कार्यालयात संतप्त झालेल्या ग्राहकांनी शुक्रवारी दुपारी हजारोंच्या संख्येने प्रवेश करून अधिकारी वर्गाला धारेवर धरले आहे.

पोस्ट ऑफिस आणि बीएसएनएलच्या बेजबाबदारपणाचा फटका मडगावमधील बीएसएनएलची लॅन्डलाईन वापरणाऱ्या ग्राहकांना दुप्पट बिलाच्या स्वरूपात बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी बीएसएनएलच्या कार्यालयात धाव घेतली असता त्यांना गेल्या महिन्यातील भरलेले बिल पणजी कार्यालयात पोचले नसल्याचे समोर आले आले. या गोंधळामुळे दोन्ही महिन्याची बिले एकत्र आल्याने ग्राहकांनी मडगावच्या बीएसएनएलच्या कार्यालयात धाव घेतली. बीएसएनएलची बिले पोस्ट ऑफिसमध्ये भरण्याची परवानगी आहे. लोकांनी डिसेंबर महिन्याची बिले पोस्ट ऑफिसमध्ये भरली होती. पण काही तांत्रिक कारणांमुळे लोकांनी भरलेली बिले बीएसएनएलच्या पणजी कार्यालयात अपडेट झाली नाहीत. तसेच बीएसएनएलने मागील महिन्याच्या बिलाला त्या पूर्वीच्या महिन्याचे बिल जोडून ग्राहकांना पाठवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. लोकांनी ही माहिती जाणून घेऊन अधिकार्यांना धारेवर धरले असून पोस्ट अधीक्षकाना पत्र व्यवहार करण्यात आला आहे.

त्यावेळी म्हापसा विभागाच्या टपाल अधीक्षकांनी त्वरित या प्रकाराची दाखल घेत म्हापसा, वास्को, मडगाव, कुडचडे आणि फोंडा या टपाल कार्यालयांना पत्र करून बीएसएनएलचे बिल स्वीकारताना सर्व प्रोसेस पार पाडून ग्राहकांना त्वरित बिलाच्या रकमेची पावती द्यावी, असे आदेश दिले आहेत.